घरCORONA UPDATEशिधावाटप दुकानदाराला ५० हजाराला फसविले

शिधावाटप दुकानदाराला ५० हजाराला फसविले

Subscribe

नगरसेवक राजेश फुलवरिया यांनी दोन हजार किलो तांदूळ देण्यास सांगितले आहे, असे सांगितले. 

नेहरू नगर येथे तिघांनी एका व्यक्तीस धमकावून ५० हजार रुपये लुटले. आम्ही मीडियाची लोक आहोत, असे सांगून संबंधित इसमाला घाबरवले. संबंधित व्यक्तीचे शिधावाटपाचे दुकान असून संबंधित तिन्ही इसमांविरुद्ध त्यांनी तक्रार केली. इम्तियाज शेख, मोहम्मद शेख, अक्षय हे तिघे १४ एप्रिल रोजी त्यांच्या दुकानात गेले. नगरसेवक राजेश फुलवरिया यांनी दोन हजार किलो तांदूळ देण्यास सांगितले आहे, असे सांगितले.

फिर्यादी यांनी तिघांना नकार दिला, त्यानंतर सदर तीन इसम १६ एप्रिल रोजी पुन्हा त्यांच्या दुकानात गेले व त्यांनी फिर्यादीला सांगितले की, आम्ही मीडियावाले आहोत. तसेच दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने त्यास नकार दिल्यावर ते निघून गेले. त्यानंतर १७ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा त्यांच्या दुकानावर आले. त्यावेळी त्यांनी फिर्यादीस तुम कितना पैसा दे सकते हो, अशी विचारणा केली असता फिर्यादी यांनी आरोपी यांना रोख रुपये ५० हजार रुपये दिले.

- Advertisement -

१८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता फिर्यादी माहिती मिळाली की काही पत्रकार दुसऱ्या रेशन दुकानावर गोंधळ करीत आहेत. फिर्यादी सदर ठिकाणी पोहोचले असता १८ एप्रिल रोजी  त्यांच्या दुकानावर आलेला इसम इम्तियाज रफिक शेख पत्रकार हा त्या ठिकाणी रेशन घेण्यास आलेल्या लोकांना त्याचे नावाचे कार्ड वाटत होता. सदर ठिकाणी गर्दी झाल्याने पोलीस त्या ठिकाणी आले व सदर पत्रकारास पोलीस ठाणे येथे नेण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यात आले त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. ताब्यात असलेला इसम इम्तियाज रफिक करीम शेख (वय ३२) वर्षे यास कलम ४१ (अ) (१) सीआरपीसी अन्वये नोटीस देण्यात आली आहे, अशी मागणी नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -