घरमहाराष्ट्रBMC Covid Scam : आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांची 8.30 तास ईडी चौकशी

BMC Covid Scam : आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांची 8.30 तास ईडी चौकशी

Subscribe

मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून सध्या छापेमारी सुरू आहे. मुंबईत एकाच दिवसात 15 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाण हे आज दुपारी 12.30 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. परंतु साडेआठ तासांच्या चौकशीनंतर ते ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची जवळपास 8.30 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली.

सूरज चव्हाण यांच्या चौकशीत त्यांनी 10 कोटी किंमतीचे 4 फ्लॅट खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे. तसेच चव्हाण यांचा कॉन्ट्रॅक्ट डिलिंगमध्ये सहभाग होता, असा ईडीला संशय आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेकांना कंत्राटं मिळवून दिल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येतोय. ईडीचे वरिष्ठ अधिकारी ईडी कार्यालयात आहेत. ईडी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

ईडीने सूरज चव्हाण यांना आज समन्स बजावले होते. त्यानुसार ते चौकशीला ईडी कार्यालयात हजर राहिले. कोरोना काळातील लाइफलाइन कंपनी घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरी छापेमारी झाली होती. या छापेमारीत त्यांच्या घरी 100 कोटींच्या स्थावर मालमत्तेचे कागदपत्रे तसेच 15 कोटींची एफडी मिळाली. याप्रकरणी जयस्वाल यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या नावाखाली पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या आदेशाने मनमानीपणे कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. या खर्चाचा अद्याप हिशोब लागलेला नाही, असा थेट आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. तर, मार्च 2020पासून आज ऑक्टोबर 2021पर्यंत पालिकेने सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च केला होता. त्यानंतरही खर्च वाढल्याने आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपाने केली होती.

- Advertisement -


हेही वाचा : BMC Covid Center scam : पालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू ईडीच्या रडारवर?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -