घरमहाराष्ट्रराज्यात रुग्णांची संख्या १५ हजार पार

राज्यात रुग्णांची संख्या १५ हजार पार

Subscribe

८४१ नवे रुग्ण, ३४ जणांचा मृत्यू

राज्यात ८४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून करोनाबाधित रुग्णांची संख्या १५,५२५ झाली आहे. तसेच राज्यात ३४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६१७ झाली आहे. तर ३५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात ३४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईमधील सर्वाधिक २६, पुण्यातील ६,औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २४ पुरुष तर १० महिला आहेत. तसेच ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे.

- Advertisement -

३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात आजपर्यंत २८१९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,८२,८८४ नमुन्यांपैकी १,६७,२०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -