घरमहाराष्ट्रकोल्हापुरातील भीषण अपघातात ४ ठार; ४ जण जखमी

कोल्हापुरातील भीषण अपघातात ४ ठार; ४ जण जखमी

Subscribe

कोल्हापूरच्या भोगावती परिसरातील घोटवडे याठिकाणी डंपर आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

कोल्हापुरात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. कोल्हापुरातील घोटवळे जवळ डंपर आणि ट्रॅक्समध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार झाले असून चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात

कोल्हापूरच्या भोगावती परिसरातील घोटवडे याठिकाणी आज सकाळच्या सुमारास डंपर आणि ट्रॅक्समध्ये अपघात झाला आहे. ट्रॅक्स कार गोकुळशिरगावच्या दिशेने जात होती. त्याचवेळी घोटवडे जवळ डंपर आणि ट्रॅक्सची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -