घरमुंबईमालाड भिंत दुर्घटनेचा २९ वा बळी

मालाड भिंत दुर्घटनेचा २९ वा बळी

Subscribe

मालाडच्या पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर या परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आता २९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मालाडच्या पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर या परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २९ झाली आहे. २१ वर्षीय राजू प्रकाश बने असं या मुलाचं नाव आहे. घटना घडल्यानंतर तत्काळ राजूला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याला तीन दिवसांपूर्वीच केईएमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं. राजूला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. तसंच शरीरावर अनेक जखमाही होत्या. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याला केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी सायंकाळी राजू बनेला हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती के ई एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

वाहून गेलेला मृतदेह सापडला वर्सोवा समुद्रकिनारी

या दुर्घटनेत काही जण वाहून देखील गेल्याचं कळतंय. वाहून गेलेल्या सोनाली सपकाळ (२४) या मुलीचा मृतदेह वर्सोवा समुद्रकिनारी सापडला आहे. या मुलीचा मृतदेह नाल्यामधून वाहून जाऊन समुद्रकिनारी वाहून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील ६९ जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री १ च्या सुमारास अचानक भिंत झोपड्यांवर कोसळल्याने या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना नेमकं कुठे पळावं? हे सूचतच नव्हतं. त्यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. तर, आंबेडकर नगर परिसरातील अनेक झोपड्यांचं नुकसान झालं. स्थानिक जमिनीखाली आपला संसार शोधत होते. ही परिस्थिती आजही कायम आहे.


हेही वाचा – मालाडमध्ये भिंत कोसळली; घटनास्थळाची विदारक दृश्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -