घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

नाशिकमध्ये मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत.

नाशिकच्या पिंपळगावाजवळ एसटी बस आणि जीपला भीषण अपघात झालाय. मुंबई-गोवा हायवेवरील शिरवाडे फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत.

जीपचा टायर फुटल्याने घडली घटना

मुंबई-आग्रा महामार्गावरुन नाशिककडे जाणाऱ्या जीपचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात झालाय. टायर फुटल्याने जीप डिव्हायडरला ओलांडून नाशिककडून वडाळीभोईकडे जाणाऱ्या एसटी बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांवर पिंपळगाव बसवत येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

लग्नाला जात असताना काळाने केला घात

चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारात ही घटना घडली आहे. सटाणा तालुक्यातील किकवारी खुर्द येथील काही जण जीपने लग्नासाठी जात असताना ही घटना घडली. जीपचा टायर फुटल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातातील मृतांमध्ये ५ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अपघातचामध्ये जीप आणि एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -