घरमनोरंजनप्रियांका चोप्राची 'अनफिनिश्ड' स्टोरी !

प्रियांका चोप्राची ‘अनफिनिश्ड’ स्टोरी !

Subscribe

देसी गर्ल प्रियांका चोप्राची गुपितं उघडणारं 'अनफिनिश्ड' हे नवं पुस्तक लवकरंच प्रदर्शित होत आहे. प्रियांकाच्या खासगी आयुष्यातल्या अनेक चांगल्या-वाईट गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरते आहे. ही ‘देसी’ गर्ल नुकत्याच तिच्या कथित ‘विदेशी’ बॉयफ्रेंडला घेऊन भारतात आली आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड निक जोन्स यांचीच सगळीकडे जोरदार चर्चा आहे. प्रियांका नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबाबत गुपित पाळणं पसंत करते. तिच्या खासगी आयुष्यातली सिक्रेट्स ती फार कमीवेळा चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र, आता लवकरच प्रियांका चोप्राच्या आयुष्यातील अशीच काही गुपितं सर्वांसमोर उलगडणार आहेत.

‘अनफिनिश्ड’ स्टोरीजचा मामला

प्रियांका चोप्राच्या आयुष्यातील काही खासगी आणि व्यावसायिक बाबी आता पुन्हा एकदा पुस्तकाच्या रुपातून आपल्यासमोर येणार आहेत. ‘अनफिनिश्ड’ असं या पुस्तकाचं नाव असणार आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याआधी प्रियांका चोप्राविषयीच्या सर्वांना माहित नसलेल्या काही गोष्टी ‘द डार्क हॉर्स’ या पुस्तकात मांडण्यात आल्या होत्या. ‘अनफिनिश्ड’ हे प्रियांकाच्या अनटोल्ड स्टोरीजवरचं दुसरं पुस्तक असणार आहे.

- Advertisement -

‘अनफिनिश्ड’मध्ये काय वाचायला मिळणार?

प्रियांका चोप्राच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडीत असलेल्या पण लोकांना माहित नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात मांडण्यात येणार आहेत. एक यशस्वी अभिनेत्री, निर्मीती आणि ‘युनिसेफ’ची सदिच्छा दूत या तिन्ही भूमिकांमध्ये वारणाऱ्या प्रियाकांचे अनुभव तसंच या प्रवासादरम्यान आजवर तिला आलेले चांगले-वाईट अनुभव या सर्व गोष्टी आपल्याला ‘अनफिनिश्ड’मध्ये वाचायला मिळणार आहेत. अमेरिकेच्या ‘बॅलेनटाईन बुक्स’ या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून, सुरुवातीला केवळ अमेरिका आणि लंडनमध्येच हे पुस्तक प्रदर्शित होईल.

दरम्यान ”हे पुस्तक माझ्या आयुष्यातील चांगल्या-वाईट प्रसंगांचं कथाविश्व असून, मला वाटतं की ते अनेक स्त्रियांसाठी प्रेरणात्मक ठरेल”, असं मत प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे. प्रियांकाचे भारतीय चाहतेही हे पुस्तक वाचण्यास उत्सुक असणारं यात काही शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -