घरमहाराष्ट्रकथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यांची लोकायुक्तांद्वारे चौकशी करा - आदित्य ठाकरे

कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यांची लोकायुक्तांद्वारे चौकशी करा – आदित्य ठाकरे

Subscribe

मुंबई | मुंबई महापालिकेतील कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळाप्रकरणाची लोकायुक्तांद्वारे चौकशी करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी सभा त्याग केली. यामुळे विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित झाले आहे. यानंतर आदित्य ठाकरेंनी विधिमंडळ भवनात माध्यमाशी बोलताना मुंबई महापालिकेचे घोटाळ्यांवर राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे.

 

- Advertisement -

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मुंबई मनपातील कथित फर्निटर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एक समिती घटित केलेली आहे. पण या समितीत कोण असणार आहेत. स्वत:च्या कॉन्ट्रैक्टर मित्राला क्लीन चिट देण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे का? यामुळे मुंबई मनपाच्या कथित फर्निटर घोटाळ्याची चौकशी ही लोकायुक्तांद्वारे व्हावी. फ्री हँड आणि फ्री फिअर चौकशी व्हावी. मुंबई मनपाकडे बैठकीचे रिपोर्ट आणि मिनिट मागितले होते. पण अजूनही मुंबई मनपाने दिले नाहीत. यामुळे  फर्निटर घोटाळा झाल्याचे निश्चित आहे.”

 

- Advertisement -

हेही वाचा – ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? आदित्य ठाकरे यांचा खोचक सवाल

 

मंत्रीमंडळाचा विस्तार होणे अशक्य

एक वर्षापूर्वी जी ओरिजिनल गद्दारांची बँच होती, त्यांना मंत्री पद मिळेल, असे वाटत होते. आज त्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनातील भावना कळत होत्या. विस्ताराने अजून लोक विस्तार करून सरकारमध्ये आली. पण शिंदे गटाच्या आमदारांचा विस्तार काही होताना दिसत नाही. या आमदारांना काही खाते मिळणार नाही आणि मंत्रीमंडळाचा विस्तार होणे शक्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -