घरमहाराष्ट्रओला दुष्काळ पाहणीसाठी आदित्य ठाकरे कोकणात

ओला दुष्काळ पाहणीसाठी आदित्य ठाकरे कोकणात

Subscribe

सध्या राज्यात परतीचा पाऊस लांबल्यामुळे ठिकठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. उभी पिके नष्ट झाली असून पिकांना कोंब फुटू लागले आहेत. पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: कोकणच्या परिसरात या पावसामुळे भरपूर नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे हे ३१ ऑक्टोबरपासून कोकणच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

कोकण भागात अतिमुसळधार पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या वेळीच पावसाच्या तडाख्याने बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेले भातशेतीचे पिक वाया गेले आहे. याच ओल्या दुष्काळग्रस्त भागाचा आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कुवे या गावापासून सुरू होणार आहे.

- Advertisement -

याच दिवशी राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातही दौरा करणार आहेत. नुकतेच कोकणात ’क्यार’ चक्रीवादळाने समुद्र किनार्‍यावरील मच्छिमारांचेही मोठे नुकसान केले आहे. वेंगुर्ले येथील उभादांडा किनार्‍यावरील मच्छिमारांनाही यावेळी आदित्य ठाकरे भेटणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -