घरक्रीडाविराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

Subscribe

ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाकडून धमकी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना कोहलीला जीवे मारण्यासाठी कट रचत असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या माहितीनंतर देशभरात एकच खळबळ उडाली असून विराट कोहलीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा ही नव्याने स्थापन झालेली दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची पाळेमुळे थेट पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या मदतीने या संघटनेची स्थापना केल्याचे म्हटले जाते. मात्र या दहशतवादी संघटनेबाबत फार काही माहिती भारतीय सुरक्षा दलांना नाही.

- Advertisement -

या संघटनेच्या हिटलिस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप अध्यक्ष अमित शहा यांची नावेदेखील आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेने तयार केलेली हिटलिस्ट भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. याबद्दलची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आली आहे.

यानंतर तपास यंत्रणेने ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाची पाळमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टमध्ये अनेक प्रख्यात व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -