घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, आदिवासी बांधवांना दिल्या शुभेच्छा

आदित्य ठाकरेंनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, आदिवासी बांधवांना दिल्या शुभेच्छा

Subscribe

रहिवाशांकडून मिळणारे प्रेम भारावून टाकणारे आहे - आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना ट्विट करत शुभेच्छा दिल्य आहेत. राज्यात आदिवासी बांधवांनी नृत्यू करत आदिवासी दिन साजरा केला आहे. आरे कॉलनीत पाड्यातील नागरिकांनीही नृत्य करुन आदिवासी दिन साजरा केला आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आदिवासी बांधवांसोबत आदिवासी नृत्य केला आहे. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आरे कॉलीनीतील पाड्यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन केले. जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य केले. यावेळी आदिवासी बांधवांच्या विनंतीला मान देत आदित्य ठाकरे यांनीही आदिवासी नृत्य केलं आहे. आदित्य ठाकरे नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा आदित्य ठाकरेंनी दिल्या आहेत. “पंचतत्त्वांशी जवळचे नाते असणाऱ्या माझ्या आदिवासी बांधव-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आरे कॉलनी येथील पाड्यामधील नागरिकांसह हा दिवस साजरा करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. येथील रहिवाशांकडून मिळणारे प्रेम भारावून टाकणारे आहे” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

- Advertisement -

राजभवनावर आदिवासी दिन साजरा

जागतिक आदिवासी दिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितही राजभवनावर झाला. राजभवनावरही आदिवासी बांधवांनी नृत्य करत मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -