घरदेश-विदेश१०० दिवस... १ लाख बळी...अजूनही उपाय नाहीच!

१०० दिवस… १ लाख बळी…अजूनही उपाय नाहीच!

Subscribe

करोनाला हरवण्यासाठी संयम, सोशल डिस्टन्सिंग आणि अविरत लढा हीच आयुधे

चीनमधील वुहान शहरात जन्माला आलेल्या करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी शंभर दिवस झाले. या शंभर दिवसांत दोनशेहून अधिक देशांमध्ये या विषाणूने हाहा:कार माजवला असून अमेरिकेसारख्या जगातील महासत्ता असलेल्या बलाढ्य देशांनीही या करोनापुढे गुडघे टेकवले आहेत. करोना जन्माला आल्यापासूनच जगभरातील संशोधक त्याचा नायनाट करणारी लस शोधण्यात गुंतले आहेत. मात्र अद्याप कोणालाही त्यात यश आलेले नाही. करोनाचा कहर अजूनही सुरूच असून जगभरात १६ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून सुमारे लाखभर लोकांना जीव गमवावा लागला आहे.

चीनमध्ये करोनाचा जन्म नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाला. पण चीनने ही गोष्ट जगापासून लपवली. या दरम्यान चीनमध्ये करोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. यामुळे नाईलाजाने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला रात्री १.३८ मिनिटांनी चीनने कोरोना व्हायरसचा जगासमोर खुलासा केला. त्यानंतर हा व्हायरस १.१ कोटी लोकसंख्या असलेल्या वुहान मधील मांसबाजारातून पसरल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

त्यानंतर १ जानेवारीलाच वुहान मधील मांस बाजार बंद करण्यात आला. या बाजारातून मोठ्या प्रमाणावर मांस तैवान, हाँगकांग, सिंगापूरला निर्यात होत असल्याने तेथे लोकांची स्क्रिनिंग सुरू करण्यात आली. तोपर्यंत हा व्हायरस मांसातूनच पसरत असल्याचा दावा चीन करत होते.

पण नंतर माणसेच या विषाणूंचे वाहक असल्याचे समोर आले.९ जानेवारीला चीनी संशोधकांनी कोरोना हा नवीन व्हायरस असल्याचे जाहीर केले. पण तोपर्यंत या व्हायरसने चीनमध्ये शेकडो लोकांचे बळी घेतले होते. एक करोनावाहक व्यक्तीमुळे ४०० जणांना लागण होत असल्याचे समोर आले आणि चीनच नाही तर संपूर्ण जगच हादरले.

- Advertisement -

तोपर्यंत हा व्हायरस फक्त चीनमध्येच पसरल्याने जगातील इतर देश निश्चिंत होते. यादरम्यान चीनमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. पण नंतर १३ जानेवारीला लॉकडाऊन हटवण्यात आला. यामुळे चीनमध्ये शिकणारा एक विद्यार्थी आपल्या देशात थायलंडला रवाना झाला. पण तो थायलंडमध्ये आला तो करोना घेऊनच. नंतर अशाच पद्धतीने २० जानेवारीपर्यंत चीनमधील बीजिंग, शांघाय आणि गुआंगदोंगमध्ये कोरोना पसरला. पण तरीही लोकांचे प्रवास करणे सुरुच होते. यामुळे करोना थेट इराण, इटली, स्पेन, अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानमध्ये पोहचला.

करोनाच्या हाहा:कारामुळे परदेशात राहणार्‍या नागरिकांनी मायदेशांची वाट धरली आणि सातासमुद्रापार जन्माला आलेला करोना भारतातही या प्रवाशांच्या माध्यमातून पोहचला. ३१ जानेवारीला भारत, ब्रिटन, स्पेन, आणि इटलीत पोहचला. पण स्पेनचा अतिविश्वास नडला आणि करोना तेथेच विसावला. त्यानंतर अमेरिकेने चीनी प्रवाशांवर अमेरिकेत बंदी घातली. चार फेब्रुवारीपर्यंत चीनमध्ये २५ हजार लोकांचा मृत्यू झाला. तर हजारो लोकांना करोनाची लागण झाली. डॉक्टर ली वेनलियांग यांचा मृत्यूही याच दरम्यान झाला. पण अमेरिका व इतर देश बेफिकीर होते. यादरम्यान कोरोनाने युरोपिय देशात थैमान घालण्यास सुरुवात केली होती.

२२ ते २३ मार्च मध्ये भारतात करोना रुग्णांचा आकडा वाढला. त्यानंतर जनता कर्फ्यू करण्यात आला. पण लोकांनी त्याला दिलेला अनपेक्षित प्रतिसाद बघता व लोकांचा गोंधळ बघता २४ मार्चला संपू्र्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग व मास्कची सक्ती करण्यात आली. पण लोकांनी त्याचाही फज्जा उडवला. कोरोनाबद्दल गांभीर्यच नसल्याने भारतात व त्यातही महाराष्ट्रात करोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे. आजच्या तारखेला देशात सात हजाराहून अधिक करोना रुग्ण आहेत. तर मुंबईत करोनाने झोपडपट्टयांमध्ये प्रवेश केल्याने मुंबईत करोनाचे हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. त्यातही तबलीगी जमातीच्या मरकजमध्ये सामील झालेले ५० हून अधिक जण अजूनही लपून बसल्याने मुंबई करोनाच प्रमुख केंद्र बनले आहे.

जगभरातील एकूण करोना रुग्ण – 16,32,577
आतापर्यंतचे मृत्यू – 97,583 बरे झालेले – 3, 66, 584
चीन- ८१,९०७ नवीन रुग्ण ७७११, मृत्यू ३,३४५
अमेरिका – 4,75,237 नवीन रुग्ण 6671, मृत्यू 17,055
स्पेन- 1,57,022, नवीन रुग्ण 3,800, मृत्यू 15,843
इटली- 1,43,626, नविन रुग्ण 18,300, मृत्यू 18,279
जर्मनी- 1,19,401, नवीन रुग्ण 1,166, मृत्यू 2,6०७
फ्रान्स- 1,17,749, नवीन रुग्ण 12,000 मृत्यू 12,210
भारत- ६,७६१ नवीन रुग्ण ४३५ मृत्यू २०६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -