घरमहाराष्ट्रकृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी साधला पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी साधला पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद

Subscribe

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 29 ऑगस्ट रोजी मंत्रालयात विविध पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला.

मुंबई : शासकीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आणि सूचनांचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.  अनुभवी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील अन्य शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. (Agriculture Minister Dhananjay Munde interacted with award winning progressive farmers)

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 29 ऑगस्ट रोजी मंत्रालयात विविध पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. प्रगतशील व वेगवेगळे पुरस्कारप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन अशा पद्धतीने संवाद साधून शेतकऱ्यांच्या आधुनिकतेचा फायदा अन्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पुढाकार घेणारे धनंजय मुंडे हे पहिलेच कृषीमंत्री ठरले आहेत. या बैठकीला कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव गणेश पाटील, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर देशमुख, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश पाटील, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त विजय चौधरी, कृषी भूषण नाथराव कराड, पंडित दीनदयाळ पुरस्कार प्राप्त प्रल्हाद वरे, कृषीरत्न संजीव माने, राजेंद्र गायकवाड, कृषीभूषण यज्ञेश सावे, शेतीमित्र वालचंद धुनावत, कृषीभूषण मच्छिंद्र कुंभार तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बीजोत्पादन अधिकारी उदयकुमार काचोळे, मृद रसायनशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. अमोल मिसाळ, डॉ भरत वाघमोडे, डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेचा दणका : ठाकरे गट ‘केईएम’वर धडकताच मिळाले कारभार सुधारण्याची आश्वासन

कोविडमुळे रखडलेले सगळे उपक्रम राबविले जाणार

यावेळी शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करावी, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावे, कृषी विभागाच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण करावे, पुरस्काराच्या रकमेत वाढ करावी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतीच्या कामांची संख्या वाढवावी, पीक विमा योजनेतील तालुका,जिल्हा व राज्यनिहाय तक्रार समित्यांवर शेतकऱ्यांची नियुक्ती करावी, शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे तो वाढवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केल्या. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोविड व इतर कारणांमुळे रखडलेले पुरस्कारांचे वितरण लवकरच केले जाणार असल्याचे जाहीर केले तसेच कृषी विभागाशी संबंधित सर्व मागण्या सकारात्मकपणे विचारात घेतल्या जातील तसेच इतर मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.

- Advertisement -

हेही वाचा : पक्षफुटीनंतर शरद पवार गट सक्रीय; रोहणी खडसेंवर सोपवली मोठी जबाबदारी

राज्यस्तरीय बैठकीचे केले जाणार आयोजन

याप्रसंगी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सर्व कृषीपुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रतिनिधी यांची चारही विद्यापीठांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व कुलगुरू, कृषी आयुक्त यांच्या समवेत एक राज्यस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकाना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -