घरमहाराष्ट्रकंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू; चालकाला अटक

कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू; चालकाला अटक

Subscribe

अहमदनगर येथे कंटेनरच्या अपघात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला असून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असताना पुन्हा एकदा अहमदनगर येथे कंटेनर आणि दुचाकीमध्ये धडक होऊन अपघात झाल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्य़ाची घटना घडली आहे. भरधाव कंटेनर चालकाने मोटारसायकल आणि चारचाकी गाडीला धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

अहमदनगर – मनमाड हायवेवर बोल्हेगाव फाट्यापासून सुसाट वेगाने निघालेल्या कंटेनरने शनिवारी मध्यरात्री तीन ते चार वाहनांना धडक दिली. त्यानंतर भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने पुढे जाऊन एका मोटार सायकल स्वाराला धडके दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार संदीप भास्कर पिंपळे हा जागीच ठार झाला आहे. या घटनेची माहिती इतर वाहनचालकाने पोलिसांना माहिती दिली. या मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांनी प्रेमदान चौकात कंटेनर अडवून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -