घरमहाराष्ट्रकेडगाव हत्याकांड : संदीप कोतकरला सीआयडीने घेतले ताब्यात!

केडगाव हत्याकांड : संदीप कोतकरला सीआयडीने घेतले ताब्यात!

Subscribe

केडगाव हत्याकांड प्रकरणी सीआयडीने अहमदनगरचा माजी महापौर संदीप कोतकरला ताब्यात घेतले आहे. नाशिक सत्र न्यायालयाने एका हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे संदीप कोतकर नाशिक मध्यवर्ती न्यायालयाची हवा खात होता. सोमवारी सीआयडीने केडगाव हत्याकांड प्रकरणी त्याला ताब्यात घेतल आहे.

अहमदनगरच्या केडगाव येथे ७ जानेवारी २०१८ रोजी हत्यांकाड झाले होते. या हत्याकांडामध्ये दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात होते. हे हत्याकांड केडगाव प्रभाग क्रमांक ३२ मधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडले होते. या हत्याकांडाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सीआयडीने केलेल्या तपासात अहमदनगरचा माजी महापौर संदीप कोतकरचा देखील हात असल्याचे निषपन्न झाले आहे. त्यामुळे सीआयडीने संदीप कोतकरवर अटकेची कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. संदीप कोतकर काही दिवसांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहाची हवा खात आहे. त्याला एका खून प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा – केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे?

- Advertisement -

अहमदनगरच्या जिल्हा कोर्टात सादर करणार

गेल्या काही दिवसांपासून केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी सीआयडीने अहमदनगर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या दोषारोपपत्रात खुनाच्या कटात संदीप कोतकरचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती. अखेर मंगळवारी सीआयडीने त्याला नाशिक मध्यवर्ती न्यायालयातून ताब्यात घेतले असून मंगळवारी त्याला न्यायालयात सादर केले जाणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोडगाव येथील एका प्रभागात पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल कोतकर जिंकला होता. तो काँग्रेसचा उमेदवार होता. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय पटारे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वादविवाद झाला आणि त्याचे रुपांतर हत्याकांडात झाले. ७ एप्रिल २०१८ रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या केडगाव प्रभागात वसंत ठुबे आणि संजय कोतकर या दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सीआयडीने आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप, भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -