घरदेश-विदेशअल्पवयीन मुलीवर बलात्कार; सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला अटक

Subscribe

आरोपी सतीशविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर आजोबाच्या वयाच्या माणसाने बलात्कार केला आहे. दिल्लीच्या पहाडगंज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ६२ वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन मुलीला गाझियाबादवरुन दिल्लीत आणून बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सतीश असे या आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गाझियाबाद येथे राहणारी आहे. कुटुंबियांसोबत भांडण झाल्यामुळे ती घर सोडून निघून आली होती. गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर ती रडत बसली असल्याचे आरोपीने पाहिले होते. एकटी असल्याचा त्याने फायदा घेत पीडित मुलीच्या जवळ जाऊन तिची विचारपूस करत तिचे सांत्वन केले. त्याने तिला दिल्लीला येते का असं विचारले असता ती आधी नाही म्हणाली. मात्र नंतर ती सतीश सोबत जायला तयार झाली. त्यानंतर सतीश तिला दिल्लीला घेऊन आला. दिल्लीतल्या पहाडगंज येथील एका हॉटेलवर पीडित मुलीला नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला.

- Advertisement -

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक

आरोपीने दुसऱ्या दिवशी पीडित मुलीला दिल्लीतील प्राणी संग्रहालय पहायला घेऊन गेला. त्यानंतर आरोपी त्याठिकाणावरुन फरार झाला. मुलगी पुन्हा एकटी पडली. ती आरोपी सतीशला शोधू लागली. तो सापडत नसल्यामुळे ती रडत होती. त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असता पोलिसांनी आरोपी सतीशविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपी सतीशचा शोध घेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

हेही वाचा – 

- Advertisement -

१८ वर्षांनी परतला प्रियकर, केला तिच्यावर बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -