घरमहाराष्ट्रनाशिकपुस्तकी ज्ञान सोबतच विद्यार्थ्याना आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथीचे शिक्षण

पुस्तकी ज्ञान सोबतच विद्यार्थ्याना आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथीचे शिक्षण

Subscribe

नाशिक । महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कर्मवीर भाऊराव हिरे दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार आयुर्वेद, योगा, युनानी, नॅचरोपॅथीचे शिक्षण दिले जात आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आम्ही बदल करत आहोत. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता येणार आहे. परिणामी विद्यार्थी अधिक ज्ञानसंपन्न होतील. त्याचा त्यांना गुणवत्तावाढीसाठी उपयोग होईल. शिवाय, विद्यार्थ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथीमधील अभ्यासक्रम निवडता येतील. क्रेडिट बेसिसनुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही पॅथीमधील विषय निवडता येतील, अशी माहिती महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कर्मवीर भाऊराव हिरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जी. एल. यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. बदलत्या काळानुरुप विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर दर्जेदार उपचार करता यावेत, यासाठी डिजिटल डेंटिस्ट उपक्रमदेखील सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल डेंटिस्ट उपक्रमाबद्दल काय सांगाल?

– बदलत्या काळानुरुप विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर दर्जेदार उपचार करता यावेत, यासाठी दंत महाविद्यालयात डिजिटल डेंटिस्ट उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे रुग्णांवर उपचार केले जातात. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासह शिक्षण मिळावे, या हेतूने दंत महाविद्यालयात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच, विद्यार्थ्यांना फिल्ड व्हिजिटव्दारे नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून दिली जाते. अर्पण ब्लड बँकेसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना फिल्ड व्हिजिटला नेण्यात आले आहे. येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असल्याने अनेक विद्यार्थी परदेशात रुग्णसेवा करत आहेत. संस्थेचे राज्यस्थानमधील उदयपूरमध्येही दंत महाविद्यालय आहे.

- Advertisement -

दंत महाविद्यालयाबद्दल काय सांगाल?

– महाविद्यालयात १२२ प्राध्यापक असून, ५८० विद्यार्थी आहेत. पाचशे विद्यार्थी बीडीएस, ६५ एमडीएस व २० विद्यार्थी पीएच.डी.चे शिक्षण घेत आहेत. परदेशातील विद्यापीठांच्या सहकार्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दंत परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनुभवावर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भावी जीवनात होतो. महाविद्यालयाचे २०२०-२१ मध्ये राष्ट्रीय स्तरावर २९ वे रँकिंग आहे. श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले आहे.

शैक्षणिक शुल्काबद्दल काय सांगाल?

– शासन नियमानुसारच विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांसह पालक दंत महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्नशील असतात.

- Advertisement -

दंत महाविद्यालयाच्या उपक्रमांबद्दल काय सांगाल?

– दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. दंत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय जर्नल, ई-लायब्ररीसह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासह प्रत्यक्ष रुग्णसेवा करताना होतो.

विद्यार्थ्यांना आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथीचे शिक्षण

महाविद्यालयातर्फे नाशिक जिल्ह्यातील पाच गावे आरोग्य सेवेसाठी दत्तक घेण्यात आली आहेत. या पाच गावांमध्ये रुग्णांच्या मोफत आरोग्य तपासणीसह उपचार केले जात आहेत. शिवाय, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपण केले जाते. महाविद्यालयात मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेतले जातात. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते व अभिनेत्री नाशिक दौर्‍यावर आल्यानंतर दंत महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.

दंत महाविद्यालयाच्या ओपीडीबद्दल काय सांगाल?

– दंत महाविद्यालयाच्या ओपीडीमध्ये दररोज ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येतात. ओपीडीमध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णावर दर्जेदार उपचार केले जातात. ओपीडीमध्ये अत्याधुनिक मशिनरी आहेत. एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने महाविद्यालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये तोंडाचा कर्करोगग्रस्त रुग्णांवरही उपचार केले जातात.

विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल?

– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनात्मक शिक्षण दिले जाते. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी दोन ते तीन वर्षांनंतर भारतात प्रॅक्टिस केल्यानंतर परदेशात रुग्णसेवेसाठी जातात. महाविद्यालयाच्या दंत चिकित्सकांना परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थ्यी परदेशात रुग्णसेवा देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -