घरमहाराष्ट्रपुणेAmbedkar on Sharad Pawar : 'आता अशा भेटी सुरूच राहतील'; प्रकाश आंबेकरांचे सूचक विधान

Ambedkar on Sharad Pawar : ‘आता अशा भेटी सुरूच राहतील’; प्रकाश आंबेकरांचे सूचक विधान

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने कुठलीही घोषणा केलेली नसतानाही राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

पुणे : महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनाही उघडपणे भाष्यं केलं नाही. भेटीबाबत माध्यमांनी विचारले असता आता यापुढे अशा भेटी सुरुच राहणार असल्याचं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. (Ambedkar on Sharad Pawar Now such visits will continue Indicative statement by Prakash Ambekar)

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने कुठलीही घोषणा केलेली नसतानाही राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. असे असतानाच वंचितला महाविकास आघाडीत घ्यावे की, नाही याबाबत चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार या दोन नेत्यांची भेट झाल्याची चर्चा आहे. झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांपुढे येत कुठलही भाष्यं केलं नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांपुढे येत, आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत. त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा महाविकास आघाडीत पुढील काळात सहभाग दिसून येऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा : Koregaon Bhima : कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी लाखो अनुयायांची गर्दी

खर्गेंना पाठवलेल्या पत्राचं काय?

इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घ्यावं याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले होते. मात्र, त्या पत्राचं अद्याप वंचितला उत्तर मिळाले नाही. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे. आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक सहमतीचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. ज्यादिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो त्यानंतर या पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात देशाला कसं खोकलं केलेले आहे याचा आराखडा मांडू असंही भाष्यं प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Truck Driver Strike: नवीन मोटार वाहन कायद्याला टँकरचालकांचा विरोध; उपसले संपाचे हत्यार

आंबेडकरांकडून विजय स्तंभास मानवंदना

कोरोगाव भीमा येथील शौर्याचा आज 206 दिवस असून, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर दाखल झाले होते. यावेळी कोरेगाव भीमा येथे प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेऊन सरकारचे आभार मानले. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राजकारणावरही भाष्यं केल.
यावेळी शरद पवारांच्या भेटीवर प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत, अनौपचारिक, औपचारिक कुठे ना कुठे, कधी ना कधी भेट होणारच आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात आता काही अर्थ राहिला नाही. ज्यावेळी आम्ही पत्र लिहित नव्हतो. इंडिया आघाडीत सहभागी करा. त्यात राष्ट्रवादीही आहे. शिवसेनाही आहे. त्यामुळे वारंवार भेटीगाठी होत राहणार आहे. भेट झाली तर निश्चितपणे आपल्याला सांगेन असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -