घरमहाराष्ट्रमाजी आमदार संजय बंड यांचे निधन

माजी आमदार संजय बंड यांचे निधन

Subscribe

माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते.

माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड यांचे गुरुवार, १३ डिसेंबरला हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. ५४ वर्षीय संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे घराशेजारील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते.

आज होणार अंत्यसंस्कार 

गुरुवारी देखील ते तपासणी करण्याकरीता पायीच रुग्णालयात गेले होते. मात्र तिथेच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. संजय बंड यांचा अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीकरता मोलाचा हातभार लाभला आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. आज, शुक्रवारी दुपारी रूख्मिणीनगर, विवेकानंद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

- Advertisement -

शिवसेना अमरावतीचे जिल्हाप्रमुख 

संजय बंड वलगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना सलग तीन वेळा आमदार होते. गेल्या दोन निवणुकांमध्ये त्यांचा तिवसा व बडनेरा मतदारसंघात पराभव झाला होता. शिवसैनिकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. गेल्या १० वर्षांपासून ते जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. आमदार होण्याच्या पूर्वीदेखील त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून कार्य केले होते. उत्तम संघटक, मनमिळाऊ स्वभाव आणि कार्यकर्त्यांमध्ये रमणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थी दशेपासूनच ते शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. तत्कालीन नागपूर विद्यापीठ आणि नंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या काळात त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थी सेनेचे नेतृत्व केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -