घरदेश-विदेश१६ ते १८ वयोगटातील मुलांना बाईक लायसन्स?

१६ ते १८ वयोगटातील मुलांना बाईक लायसन्स?

Subscribe

काय सांगता, १६ ते १८ वयोगटातील मुलांना देखील बाईक लायसन्स मिळणार आहे?

बाईकचं वेड सध्या प्रत्येकाला आहे. मुलगा किंवा मुलगी काहीशी मोठी झाली, की तिला लगेचच बाईक शिकवली जाते. पण, बऱ्याच वेळाला मात्र ऐ बाबा तु मागे बस, उगाच पोलिसांनी पकडलं तर लफडं नको!! असं देखील आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. कारण, बाईक चालवताना तुमच्याकडे लायसन्स गरजेचं आहे. आता लायसन्स काढायचं म्हणजे वय देखील १८ वर्षे पूर्ण हवं. पण, आता मात्रा तुमची हि चिंता देखील मिटणार आहे. कारण, १६ ते १८ वयोगटातील मुलांना देखील लायसन्स देण्यात येणार आहे. पण, हे लायसन्स केवळ इलेक्ट्रिक वाहनांपुरताच मर्यादीत असणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हे बदल सुचवले आहेत. हा प्रस्ताव लवकरच सरकारच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्यासाठी मोटार वाहन कायद्यात बदल करावा लागणार आहे. कारण, आता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लायसन्स दिलं जातं.

१६ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींना ५० सीसी इंजिन क्षमता असणाऱ्या बाईक चालविण्याची परवानगी आहे. मात्र, आपल्याकडे किमान क्षमतेची दुचाकी ही १०० सीसीची असल्याने या सवलतीचा काही उपयोग होत नाही. ही बाब लक्षात घेता हा बदल करण्यात येत आहे.

- Advertisement -

लायसन्ससाठी डिजिलॉकर 

दरम्यान, वाहनचालकांना यापुढे कागदी स्वरूपातील वाहन परवाने बाळगण्याची गरज नसल्याचेही परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या डिजिलॉकर सुविधेच्या माध्यमातून परवाने आणि नोंदणीपत्रांची सॉफ्टकॉपी दाखवणे पुरेसे ठरणार आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नसला तरी तो लवकरच होईल अशी माहिती देखील समोर येत आहे. डिजिलॉकर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टिमवर उपलब्ध असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -