घरमहाराष्ट्रवाहतूक पोलिसांच्या हाती ‘स्वाईप मशीन’

वाहतूक पोलिसांच्या हाती ‘स्वाईप मशीन’

Subscribe

दंड भरणे सोईचे होण्यासाठी वाहतूक पोलिसांना 'स्वाईप मशीन' देण्यात आले आहेत.

अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पाहणाऱ्या वाहतूक पोलिसांवर अनेकदा आर्थिक देवाण घेवाणचे आरोप होतात. हे आरोप कायमचे बंद होवून वाहनचालकांनाही दंड भरणे सोईचे व्हावे म्हणून पोलिस आणि वाहनचालक यांच्यातील रोखीचा व्यवहार बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांना ‘स्वाईप मशीन’ देण्यात आल्या आहे. यापुढे वाहनचालकांना दंड दिल्यानंतर तो ‘स्वाईप मशीन’च्याच माध्यमातून कार्डद्वारेच भरणा केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारपासून शहरात कोणत्याही वाहतूक पोलिसाला वाहनचालकासोबत ‘नियमाने’ रोखीचा व्यवहार करता येणार नाही. आमदार डॉ. सुनील देशमुख, पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिसांना ‘स्वाईप मशीन’ देण्यात आल्या आहे.

कार्डव्दारे रक्कम देणे सोयीचे

सद्यःस्थितीत शहरातील अनेक पॉइंटवर कार्यरत वाहतूक पोलिसांच्या हातात चालान पुस्तक देण्यात येते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिस चालान देऊ शकतात. याचवेळी चालानची रक्कम त्याच पोलिसाकडे द्यावी लागत होती. या व्यवहारातून अनेकदा योग्य असलेला व्यवहार दुरून पाहणाऱ्यांना ‘गैर’ वाटत होता. तर काही वेळा संबधित वाहतूक पोलिस चालानपुस्तक जवळ असल्याचा गैरफायदासुध्दा घेत असल्याचे यापूर्वी अनेकदा पुढे आले. वाहतूक पोलिसांवर वारंवार होणारे आर्थिक आरोप प्रत्यारोप तसेच वाहनचालकांनाही रोख दिल्यापेक्षा कार्डव्दारे रक्कम देणे सोयीचे होईल त्यामुळे पोलिस आयुक्तांनी महिनाभरापूर्वीच वाहतूक पोलिसांना ‘स्वाईप मशीन’ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच एका बँकेच्या मदतीने वाहतूक पोलिसांना २० ‘स्वाईप मशीन’ देण्यात आल्या असून आगामी आठ ते दहा दिवसातच आणखी चाळीस मशीन देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पोलिसांकडे रोखीने दंड भरण्याची आवश्यकता नाही. वाहनचालकाला दंड झाल्यास त्याच ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांकडे ‘स्वाईप मशीन’व्दारे किंवा आयुक्तालयातील कोणत्याही पोलिस ठाण्यात किंवा शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ४८ तासाच्या आतमध्ये जावून भरणा करता येणार आहे, मात्र हा भरणा कुठेही केला तरी ‘स्वाईप मशीन’व्दारे कार्डनेच करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -