घरक्रीडामलेशिया इंटरनॅशनल मास्टर्समध्ये ठाण्याची चमक

मलेशिया इंटरनॅशनल मास्टर्समध्ये ठाण्याची चमक

Subscribe

नुकत्याच झालेल्या ३२ व्या मलेशिया इंटरनॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

नुकत्याच झालेल्या ३२ व्या मलेशिया इंटरनॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या संघटनेच्या १० खेळाडूंनी एकूण १९ पदके जिंकण्याचा पराक्रम केला.

चार महिला खेळाडूंनी मिळवली पदके मिळवली

मलेशिया इंटरनॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या चार महिला खेळाडूंनी भारतासाठी पदके मिळवली. सुनीता औसेकरने ३ किलोमीटर चालणे या खेळात सुवर्णपदक आणि ४×४०० मी.रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. वीणा शेकदार हिने तीन पदके पटकावली. ज्यात ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक, ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक आणि ४×४०० मी.रिलेमध्ये कांस्यपदकाचा समावेश होता. श्रुतिका महाडिक हिनेही उंच उडीमध्ये सुवर्णपदक, १०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक आणि तिहेरी उडीत कांस्यपदक अशा तीन पदकांची कमाई केली. मनिषा थिटेने ४×४०० मी.रिलेमध्ये कांस्यपदक जिंकले.

पुरूष खेळाडूंनीही केली अप्रतिम कामगिरी 

महिला खेळाडूंप्रमाणेच ठाणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या पुरूष खेळाडूंनीही अप्रतिम कामगिरी केली. चारुदत्ता शेणईने उंच उडीत सुवर्णपदक आणि तिहेरी उडीत कांस्यपदक अशा दोन पदकांची कमाई केली. बाळकृष्णा गुरवने थाळीफेक आणि भालाफेकमध्ये रौप्य तर गोळाफेकमध्ये कांस्यपदक कमावले. गुंडाप्पा कुंभारने २०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक तर १०० मी. आणि ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक अशी तीन पदके मिळवली. गणेश प्रभुखोतने लांबउडी आणि तिहेरी उडीमध्ये कांस्यपदक मिळवले. तर केतनो डिसिल्वाने ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक आणि निलेश म्हसकरने ५ किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -