घरमहाराष्ट्रकेंद्राशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा...; राऊतांचा इशारा

केंद्राशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा…; राऊतांचा इशारा

Subscribe

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बुधवारी (25 ऑक्टोबर) आमरण उपोषणाला बसलेले आहे. जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपचारास नकार दिला आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला इशारा दिला आहे. केंद्र सरकारशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला याबाबतीत वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नका. ते आज माध्यमांशी बोलत होते. (An immediate decision should be taken regarding the hunger strike of the Jarange Patil after discussing with the Centre otherwise Sanjay Rauts warning)

संजय राऊत म्हणाले की, सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण करत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला हे सरकार चूड लावत आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे आणि ते हक्क त्यांना मिळायलाच हवे. ओबीसी आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर अशा अनेक समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या सरकारने पूर्ण कराव्यात. मराठा समाजाला टीकणार आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील हे उपोषण जरी करत असले तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून लोकं आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काही करत नाही. फक्त आरक्षण देऊ, योग्य वेळी देऊ ही त्यांची भाषा आहे. मराठा समाजाच्या मृतदेहावर हे सरकार आरक्षणाचा जीआर ठेवणार आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – सरकार मन की बात करत आहे, पण…, आरक्षणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सरकारवर आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, सरकार मन की बात करत आहे, पण त्याचं मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवावे आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या आत्महत्या थांबवाव्यात यासाठी सरकार कोणतेही पावलं टाकाना दिसत नाही. अशाप्रकारची चिंता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख सातत्याने जरांगे पाटील याचं उपोषण आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रात निर्माण होणारी चिंताजनक परिस्थिती याच्यावर लक्ष ठेवून आहेत. जरांगे पाटलांचे प्राण ताबडतोब वाचवायला हवेत आणि आत्महत्या थांबवायला हव्यात, ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख त्यासाठी माझ्याशी चर्चा करत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवसेनेला याबाबतीत वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये

आमच्या शिवसेनेची अशी भूमिका आहे की, सरकारने केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा आणि त्यासंदर्भात मराठा समाजाला जो हवा तो आदेश काढावा. शिवसेना अजूनही याबाबतीत फक्त समन्वयाची भूमिका घेत आहे. शिवसेनेला याबाबतीत वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये, हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आमच्या सर्वांची भूमिका मराठा समाजाला समर्थनाची आणि पोषक अशीच आहे आणि ती तथीच राहील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – ब्राह्मण समाजाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…

सरकार जरांगे पाटलांच्या प्राणाशी राजकारण करत आहेत

जरांगे पाटलांचे प्राण वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. पण सरकार मराठा समाजाशी आणि जरांगे पाटलांच्या प्राणाशी राजकारण करत आहेत. या सगळ्या प्रकारात जे सरकारमध्ये आहेत, त्या सरकारमधील लोकप्रतिनिधीची आणि मंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे. आमच्यासारखे ज्या संघटना आणि पक्ष आहेत किंवा नेते आहेत, त्यांची भूमिका पहिल्यांदापासून आहे की, जरांगे पाटलांचे प्राण वाचवावेत आणि त्यांना कोणतेही आश्वासने देऊ नयेत. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -