घरमहाराष्ट्रसरकार मन की बात करत आहे, पण..., आरक्षणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सरकार मन की बात करत आहे, पण…, आरक्षणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आरक्षणावर का बोलत नाहीत? दोन दिवसात आरक्षण देतो, असे का सांगितले जात नाही? असे सवाल जरांगे पाटील यांनी केले आहेत. त्यांची प्रकृती लक्षात घेता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवार जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा – ब्राह्मण समाजाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. आज, रविवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी, मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त केली होती. त्यावर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही माहिती का देत नाहीत? यामुळे मराठा समाजात आनंद निर्माण होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

- Advertisement -

सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी 17 दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले होते. त्याचबरोबर सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. पण सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, असे सांगत 40 दिवसांनी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने नेमलेल्या समितीने काहीच केले नाही. आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचेही सरकारने कबूल केले होते, मात्र तेही सरकारने केले नाही. आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना मदत दिलेली नाही. सोबतच शेतीचे नुकसान झालेल्यांपर्यंत नुकसान भरपाईदेखील पोहचली नाही. हे सरकार मराठा समजाची जाणूनबूजून दिशाभूल करत आहे, असा आरोप जरांगेंनी केला आहे.

हेही वाचा – मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या – मनोज जरांगे पाटील

आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण सरकार करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

जरांगे पाटील उपोषण करीत आहेत, पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. या समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असा थेट आरोप ठाकरे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -