घरताज्या घडामोडीनाल्यातून फ्रीज, पलंग वाहून आल्याने अंधेरी सब वे यंत्रणा विस्कळीत, मुंबई महापालिकेची माहिती

नाल्यातून फ्रीज, पलंग वाहून आल्याने अंधेरी सब वे यंत्रणा विस्कळीत, मुंबई महापालिकेची माहिती

Subscribe

अंधेरी भूयारी मार्गाजवळून वाहणाऱ्या मोगरा नाल्यातून वाहून आलेला 165 लीटरचा फ्रीज, मोठे कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि आदींसारख्या वस्तू व साहित्यांमुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसात अंधेरी सब वे येथील पावसाळी पाणी उपसा करणारी पंपिग यंत्रणा बंद पडली होती. मात्र अवघ्या एका तासात पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे आणि के/पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी सदर फ्रीज, कपाट, पलंग आदी वस्तू हटवून पंपिंग यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई शहर व उपनगरे परिसरात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे किंग्ज सर्कल, कुर्ला, भांडुप, सायन, मुलुंड, दहिसर, मालाड, मिलन सब वे आदी ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. तर अंधेरी सब वे येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता व मुंबईकरांनाही त्याचा फटका बसला. मात्र अंधेरी सब वे येथे नजीकच्या मोगरा मोगरा नाल्यातून वाहून आलेला 165 लीटरचा फ्रीज, मोठे कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि आदींसारख्या वस्तू व साहित्यामुळे सब वे येथे पावसामुळे साचलेल्या पाण्याचा उपसा करणारी पंपिंग यंत्रणा बंद पडली होती.

- Advertisement -

ही गंभीर बाब पालिकेच्या संबंधित यंत्रणा हाताळणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आली. त्यामुळे लगेचच अवघ्या एका तासात पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे आणि के/पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी सदर फ्रीज, कपाट, पलंग आदी वस्तू हटवून पंपिंग यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला. त्यामुळे एका तासाने अंधेरी सब वे येथील परिसरातील नागरिकांना व वाहन चालकांना दिलासा मिळण्यास मदत झाली. पालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी अंधेरीं येथील सब वे येथे रविवारी भेट देऊन पावसाळी यंत्रणेची माहिती घेतली.

तसेच, यापुढे सब वे येथे पावसाचे पाणी साचू नये, यासाठी अतिरिक्त नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या पाहणी प्रसंगी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्री. मनीष वळंजू आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : Monsoon Update : पुढील तीन दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत यलो अ‍ॅलर्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -