घरठाणेठाण्यात पावसाची दमदार हजेरी

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी

Subscribe

५८.९०मिमी पावसाची नोंद, तर ४० तक्रारी, शेड पडल्याने तिघे किरकोळ जखमी

गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्या चोविसात ५८.९० मिमी पावसाची नोंद झाली असून शनिवारी सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या दोन तासात ३५.५७ मिमी जोरदार पाऊस बरसला आहे. याचदरम्यान शहरात आठ ठिकाणी पाणी साचल्याचा घटना समोर असून सात ठिकाणी वृक्ष कोसळली आहेत. तर ठाण्यातील एका ५ स्टार हॉटेल्समध्ये शेड पडल्याने तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळपासून पाऊसाची मधेमधे रिमझिम सुरू होती. मात्र सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत पावसाने चांगली हजेरी लावली. पहिल्या एक तासात २२.३६ तर त्याच्या नंतर एक तासात १३.२१ मिमी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरला. अशाप्रकारे शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासात ५८.९० मिमी पाऊस पडला आहे. पण दोन तास झालेल्या पावसात आठ ठिकाणी शहरात पाणी साचले होते. तर सात ठिकाणी वृक्ष पडली आहेत. सहा ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची नोंद आहे. दोन ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक झाला असून एक ठिकाणी एमजीएल पाईपलाईनमधून गळती झाली होती. तर इतर १३ अशा एकूण ४० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

या ठिकाणी साचले होते पाणी
शहरातील खोपट, एसटी बस डेपो जवळ
वागळे इस्टेट येथील राधेश्याम तबेला तसेच सी. पी.तलाव, मुंब्र्यात आयडियल मार्केट आणि
गोकुळनगर येथील लाल मैदान आदी अशा आठ ठिकाणी पाणी साचले होते.\

- Advertisement -

शेड पडली, तिघे जखमी
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी येथील एका ५ स्टार हॉटेलमध्ये २ महिला व १ पुरुष बसले असताना, अचानक शेड पडली. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत असून त्यांना हिरानंदानी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. उपचार करुन घरी पाठवण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून घटनास्थळी ठामपा उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी भेट दिली. तर जखमींची नावे समजू शकले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

रविवारी तीन झाडे कोसळली
रविवारी पाऊस जरी विश्रांती घेतली असली तरी वसंत विहार येथे दोन आणि कोर्टनाका येथे एक अशा तीन झाडे कोसळली आहेत.यामध्ये वसंत विहार येथील एका घटनेत चारचाकी तर दुसऱ्या घटनेत कोर्टनाका याठिकाणी चाळीवर झाडे पडले आहे. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून ती झाडे कापून एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -