घरमहाराष्ट्रAnil Parab : अनिल परबांना मंगळवारपर्यंत अटक नाही; अभियंत्याला मारहाण प्रकरण

Anil Parab : अनिल परबांना मंगळवारपर्यंत अटक नाही; अभियंत्याला मारहाण प्रकरण

Subscribe

 

मुंबईः महापालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणात आमदार अनिल परब यांना येत्या मंगळवारपर्यंत अटक करु नये, असे आदेश सत्र न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. परब यांच्यासह गुन्हा दाखल असलेल्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

- Advertisement -

मारहाण झालेल्या अभियंत्याने अनिल परब, संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र ते आज सुनावणीसाठी उपलब्ध नव्हते. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.

हेही वाचाःराज्य सरकारची वर्षपूर्ती; उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री

- Advertisement -

अभियंत्याला मारहाण झाली तेव्हा मी तेथे होतो. याचा असा अर्थ होत नाही की मी त्या मारहाणीत सामील होतो आणि मी मारहाण केली, असा युक्तिवाद परब यांच्याकडून करण्यात आला. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने परब यांना येत्या मंगळवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले. परब यांच्यासह अन्य अर्जदारांनाही न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

22 जून 2023 रोजी वांद्रे पूर्व येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेला बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती. त्यानंतर त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर शाखा ही 44 वर्षे जुनी असल्याची माहिती तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या घटनेनंतर सोमवारी (ता. 26 जून) अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विविध नागरी समस्यांबाबत एच-पूर्व महापालिका वॉर्डवर मोर्चा काढला. यावेळी अनिल परब यांनी भाषण देखील केले. या भाषणानंतर त्यांनी अनिल परब यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळामध्ये आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शाखेचे पाडकाम केलेल्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता असलेले अजय पाटील (वय वर्ष 42) यांनी त्यांना मारहाण केल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी वाकोला पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्ररीनंतर पोलिसांनी अनिल परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध पालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला. त्यामुळे याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -