घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये, कर्मचाऱ्यांबाबत मलाही सहानभूती- अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये, कर्मचाऱ्यांबाबत मलाही सहानभूती- अनिल परब

Subscribe

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

“एसटी कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये, कर्मचाऱ्यांबाबत मलाही सहानभूती आहे. मी सतत त्यांच्यासोबत चर्चा करतोय. असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महमंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. आज पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते.

“प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांची ज्या मागणीवर चर्चा सुरु होती. त्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु आता एसटी कर्मचाऱ्यांनी आता राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची नवीन मागणी केली आहे. हायकोर्टच्या निर्देशाचे पालन आम्ही पूर्णपणे केले आहे. हायकोर्टाने कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे कमिटी स्थापन केली त्याचा लेखी अहवाल कोर्टाला दिला, ही कमिटी सर्व बाजूने विचार करुन १२ आठवड्यांच्या आत पूर्ण तपशील मुख्यमंत्र्याकडे सादर करेल त्यानंतर मुख्यमंत्री आपले मत हायकोर्टाला सादर करतील.” असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्याविरोधात कोर्टाने आदेश देत हा संप बेकायदेशीर असल्याचे ठरवले आहे. त्यानंतरही काही संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची नोटीस दिली होती, यावर आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने हा संप बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. मात्र तरीही सुरु असलेला संप आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला, यानंतर हायकोर्टाने सुचना केली की, राज्य सरकार अवमान याचिका दाखल करु शकते. त्यानुसार एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. या अवमान याचिकेवर उद्या हाय कोर्टात सुनावणी होईल त्यावेळी काय कारवाई करायची याचेही आदेश कोर्ट देईल, असही अनिल परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर

मी कर्मचाऱ्यांशी सतत बोलत राहणार, सतत आवाहन करत राहणार, यातून यशस्वी, चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासोबत प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असं अनिल परब यांनी म्हटले.


ST Workers Strike : ऐन सणासुदीच्या कालावधीत एसटी संपाने तोटा १८०० कोटी रूपयांनी वाढला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -