घरमहाराष्ट्रफडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायड्रोजन बॉम्ब आता मी टाकणार, नवाब मलिकांचा पलटवार

फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायड्रोजन बॉम्ब आता मी टाकणार, नवाब मलिकांचा पलटवार

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधीत आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांचे फटाके फुसके निघाले. मी उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं सांगितलं आहे.

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की फटाके फोडणार.
फडणवीसांचे फटाके भिजले होते त्यामुळे फुसके निघाले,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं. “एक वातावरण तयार करण्यात आलं आहे की, नवाब मलिकांचे बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांशी संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आमदार बनून १९९९ मध्ये पहिल्यांदा मुंबईत आले. ६२ सालच्या जीवनात या शहरात आपल्या आधी गोपीनाथ मुंडे दाऊद सोबत लोकांना जोडत होते. आम्ही जेव्हा मंत्री होतो तेव्हा दाऊद संदर्भात मुंडेंची भाषणं विधानसभेत झाली. ६२ वर्षाच्या जीवनात लोकप्रतिनिधी बनल्यानंतर या २६ वर्षांच्या काळात या सारखे आरोप आमच्यावर कोणी लावले नाहीत,” असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

“आज जमीनीचे कागद समोर ठेवले. दीड लाख फूट जमीन कवडी मोल दराने माफीयांकडून खरेदी केली, असा आरोप फ़डणवीसांनी केला. फडणवीसजी तुम्हाला ज्यांनी माहिती दिली ते कच्चे खिलाडी आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर मीच कागद दिले असते,” असं नवाब मलिक म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसजी मात्र उद्या सकाळी १० वाजता तुमचा अंडरवर्ल्डशी असलेला खेळ आणि मुख्यमंत्री असतांना अंडरवर्ल्डचा सहारा घेऊन तुम्ही कशाप्रकारे संपूर्ण शहराला बंदी बनवले होते. याची माहिती मी देणार आहे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

- Advertisement -

“मी कवडी मोलभावाने जमीन कुठेही घेतलेली नाही. याऊलट या मुंबई शहरामध्ये देवेंद्र फडणवीसांचे जवळचे लोकं प्लॉट हडपण्याचे धंदे कुठल्या अधिकाऱ्याच्या मार्फत करत होते आणि कुठल्या आंतरराष्ट्रीय डॉन, जो विदेशातून भारतात आला होता तो कुणासाठी काम करत होता, याची माहिती उद्या १० वाजता देणार,” असं नवाब मलिक म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -