घरमहाराष्ट्रST Workers Strike : ऐन सणासुदीच्या कालावधीत एसटी संपाने तोटा १८०० कोटी...

ST Workers Strike : ऐन सणासुदीच्या कालावधीत एसटी संपाने तोटा १८०० कोटी रूपयांनी वाढला

Subscribe

राज्याच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा भाग असलेली एसटी वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करुन घ्या आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सोमवारी हार्यकोर्टातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत एसटी महामंडळाला नवा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. दरवर्षी दिवाळी सण हा एसटी महामंडळासाठी कमाईचे साधन असते. खेड्यापाड्यातील नागरिक सणांनिमित्त नातेवाईक आणि खरेदीसाठी एसटीने प्रवास करण्यावर भर देतात. मात्र यंदा ऐन दिवाळी सणाच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी महामंडळाचा तोटा १८०० कोटी रुपयांनी वाढला आहे. यामुळे कामगारांच्या आर्थिक मागण्या एसटी महामंडळ कशा पूर्ण करणार असा प्रश्न आहे.

मात्र राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांना फटका सहन करावा लागतोय. यामुळे एसटी महामंडळाकडूनही तोट्यात असल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढ देत नाही. दरम्यान कोरोनाच्या संकट काळात सेवा बजावताना ३०६ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आर्थिक विवंचनेतून आतापर्यंत २८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्मचाऱ्यांच्या अशा बिकट परिस्थिती सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत मागण्या मान्य करण्यास विरोध करतेय.

- Advertisement -

दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळात एसटीचं ६३०० कोटींचं उत्पन्न बुडलं. प्रत्येक दिवशी तब्बल १८ कोटी रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला सहन करावे लागले.

एसटीचा एकूण संचित तोटा १२,५०० कोटी इतका आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे एसटीला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, गाड्यांच्या इंधनासाठी सरकारकडे मदत मागावी लागते. या आर्थिक अडचणीवर उपाय म्हणून २५ ऑक्टोबरपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली, मात्र तरीही हा तोटा भरून काढणे एसटी महामंडळासाठी अवघड आहे.

- Advertisement -

परिणाम अपुरे, वेळेवर न होणारे पगार, आगारांमधली वाईट परिस्थिती आणि कामाच्या वेळा या सगळ्याच्या ताणामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. एकूण एसटी कर्मचाऱ्यांनी होणारे हाल पाहता राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिना अखेरीस बेमुदत संप सुरू केले. त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता १२ टक्क्यांवरून वाढवून २८ टक्के केला. तर काही मागण्या दिवाळीनंतर मान्य करुन असे आश्वासन दिले.  मात्र तरीही संपूर्ण मान्य पूर्ण होत नाही तोवर आंदोलन थांबवणार नाही असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे २५० पैकी २२३ डेपोतील कामकाज ठप्प झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -