घरमहाराष्ट्रसंप असूनही त्या दोघींनी एसटी चालवली; महामंडळ आज सत्कार करणार

संप असूनही त्या दोघींनी एसटी चालवली; महामंडळ आज सत्कार करणार

Subscribe

राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन आज (शनिवारी, १ जून २०१९) राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकावर साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने मुंबईतील गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दोन एसटी महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

९ जून २०१७ रोजी राज्यभरातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले होते. एसटी डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. मात्र एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारातील वाहक अनिता पाटील आणि जयश्री राऊत या दोन महिला कर्मचाऱ्यांनी कुणालाही न जुमानता प्रवाशांच्या सुविधेसाठी कोल्हापूर ते पुणे अशी बस सेवा दिली. संपकाळात ५१ फेऱ्या आणि २ लाख ३० हजार रुपये महसूल एसटी महामंडळाला प्राप्त करून दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत एसटी महामंडळ वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सत्कार करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -