घरमहाराष्ट्रउद्यान बनणार कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ!

उद्यान बनणार कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ!

Subscribe

मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी असणाऱ्या उद्यानांमध्ये २८ खुली वर्तुळाकार नाट्यगृहे अस्तित्वात आहेत. या नाट्यगृहांमध्ये कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी वर्तुळाकर किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था आहे.

गायक, वादळ, नृत्यसाधक किंवा इतर कलाकार साधारणत: विविध नाट्यगृहांमध्ये कला सादर करीत असतात. यात काही कलाकार नवोदित असतात. नाट्यगृहांमध्ये नाटकांचे शो लावणे हे काही नवोदित नाट्य संस्थांना किंवा इतर कलाकृतीच्या संस्थांना परवडणारे नसते. शिवाय, बंदिस्त नाट्यगृहांपेक्षा निसर्गाच्या सानिध्यात खुल्याने असे नाट्यगृह असेल तर नाटक किंवा कलाकृती पाहण्याची मजाच काही वेगळी असेल. या दृष्टीकोनाने पालिकेने २९ उद्यानांमध्ये खुले आणि वर्तुळाकार नाट्यगृहे बनवली आहेत. या नाट्यगृहांमुळे परिसरातील कलाकारांना त्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

उद्यान खात्याची परवानगी लागेल

महापालिका उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये गायक, वादळ, नृत्यसाधक यांना आपल्या कला सादर करता येतील. यासाठी नाव नोंदणी, शुल्क आणि संबंधित कार्यपद्धतीबाबत महापालिका प्रशासन आणि ‘मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग’ यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे. तथापि, सध्या असलेल्या कार्यपद्धतीनुसार या खुल्या नाट्यगृहांमध्ये कार्यक्रम करावयाचा झाल्यास त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याची परवानगी आवश्यक आहे, अशी माहिती पालिकेचे अधिकारी जिंतेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

- Advertisement -

२८ खुली नाट्यगृहे

मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी असणाऱ्या उद्यानांमध्ये २८ खुली वर्तुळाकार नाट्यगृहे अस्तित्वात आहेत. या नाट्यगृहांमध्ये कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी वर्तुळाकर किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था आहे. या खुल्या नाट्यगृहांमधील आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी रसिकांना बसण्यासाठी खुर्च्याऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्व पायऱ्या आहेत. तसेच रसिकांना ऐसपैसरित्या बसता यावे, यासाठी या पायऱ्यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे.

परिसरातील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

या नाट्यगृहांची मर्यादित आसनक्षमता ही त्यांच्या-त्यांच्या आकारानुसार ५० आसनांपासून ५०० आसनांपर्यंत अंदाजित असून सर्व नाट्यगृहांची एकूण आसनक्षमता ही सुमारे ४ हजार ते २६० एवढी आहे. या खुल्या नाट्यगृहांचा अधिक परिणामकारक वापर करता यावा, यादृष्टीने गेल्या वर्षी गठित करण्यात आलेल्या ‘मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग’ यांनी महापालिका प्रशासनास काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने खुल्या नाट्यगृहांचे नियमित परिरक्षण करण्यासह परिसरातील कलाकारांना त्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या सूचनांचा समावेश आहे. यानुसार महापालिकेच्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही सुरु करण्यात आली असून लवकरच रसिकांना विविध कलांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अविष्करण आपल्या परिसरातील पालिका उद्यानांमध्येच अनुभवता येणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – महापालिका मुख्यालयाची  सुरक्षा जुन्या रायफलींवर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -