घरमुंबई'एमआरआय'साठी दिली २०२० ची अपॉइंटमेंट

‘एमआरआय’साठी दिली २०२० ची अपॉइंटमेंट

Subscribe

नायर हॉस्पिटलच्या एमआरआय विभागाकडे दररोज ५० ते ६० पेशंट येतात. एमआरआय लवकर करण्यात यावे त्यासाठी लवकरची तारीख देऊन उपचार करण्याची विनंती करतात. मात्र नायर हॉस्पिटलमध्ये दिवसाला फक्त १२ ते १५ एमआरआय केले जाते.

मुंबईतील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल असणाऱ्या नायर हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही एमआरआय करण्याचा विचार करत असाल तर. तर हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला २०२० ची वाट पहावी लागले. नाही तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलचा पर्याय निवडा. नायर हॉस्पिटलच्या ओव्हरबर्डेड रेडियोलॉजी विभागात फक्त एकच एमआरआय मशीन आहे. त्यातल्या त्यात परेलच्या केईएम हॉस्पिटलमध्ये जरा बसे आहे त्याठिकाणी एमआरआय करण्यासाठी २५ जुलै २०१९ पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर सायन हॉस्पिटलमध्ये एमआरआय करण्यासाठी जास्तीत जास्त तीन महिन्याची प्रतिक्षा करावी लागले.

एमआरआय न करता परत जावे लागले

अलिकडेच नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी लांबचा प्रवास करुन कोकणातून अरुण नार हे ५५ वर्षिय शेतकरी आले होते. पण उपचार न करताच त्यांना परत कोकणात घरी जावे लागले. अरुण नार यांचा मुलगा निलेश याने सांगितले की, ‘माझ्या वडिलांचे सतत पाय दुखतात. नायर हॉस्पिटलच्या ओपीडीच्या डॉक्टरांनी आम्हाला एमआरआय करायला सांगितले. आम्ही जेव्हा एमआरआय विभागाकडे गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला एमआरआय करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२० ची तारीख दिली. एमआरआयसाठी ते ऐवढ्या दिवस इथे थांबू शकत नाहीत त्यामुळे ते ताबडतोब तिथून निघून गेले.’

- Advertisement -

पेशंटची समस्या आम्ही समजतो

नायर हॉस्पिटलच्या एमआरआय विभागाकडे दररोज ५० ते ६० पेशंट येतात. एमआरआय लवकर करण्यात यावे त्यासाठी लवकरची तारीख देऊन उपचार करण्याची विनंती करतात. मात्र नायर हॉस्पिटलमध्ये दिवसाला फक्त १२ ते १५ एमआरआय केले जाते. नायर हॉस्पिटलच्या एका निवासी डॉक्टरने सांगितले की, ‘आम्हाला वाईट वाटते जेव्हा आम्ही पेशंटला १५ ते १६ महिन्यानंतर या असे सांगतो. पण आमच्याकडे दुसरा मार्ग नाही. एकच मशिन असल्यामुळे दिवसाला त्याच मशिनवर अनेकांचे एमआरआय करावे लागतात. एमआरआय स्कॅन करणयासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ८ ते १५ हजार रुपये खर्च करावे लागतात मात्र आमच्याकडे फक्त २५०० रुपयामध्ये एमआरआय केले जाते. आम्ही समजू शकतो की, पेशंट असहाय्य आहेत. कधीकधी, पेशंटना एमआरआय करणे शक्य नसल्यास आम्ही त्यांना सूट देतो किंवा विनामूल्य करुन देतो.’

‘सिंगल शिफ्ट ही एक समस्या आहे. आम्ही इतर जवळची हॉस्पिटल आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलचे क्रमांक आणि सर्व माहिती पोस्ट केली आहे. जेथे पेशंट भेट देऊ शकतात आणि सामान्य किंमतीत आपली तपासणी करु शकतात. एमआरआयची तारीख देताना आम्ही तात्काळ विचार देखील करतो.’ – रमेश भर्मल – नायर हॉस्पिटलचे डीन

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -