घरदेश-विदेशLive Update : एकदा काय झाले हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; राष्टीय चित्रपट...

Live Update : एकदा काय झाले हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; राष्टीय चित्रपट पुरस्कार जाहीर 

Subscribe

एकदा काय झाले हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; राष्टीय चित्रपट पुरस्कार जाहीर


भारतीय ग्रॅंड मास्टर प्रज्ञानंद याचा बुद्धीबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव

- Advertisement -

कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ;  आठ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ


किशोरी पेडणेकर यांना 29 ऑगस्टपर्यंत अटकेपासून सत्र न्यायालयाकडून दिलासा

- Advertisement -

कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण


आमच्या पक्षात कुठेही फुट नाही – सुप्रिया सुळे


शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या दोन तासांपासून मुंबई – आग्रा महामार्ग ठप्प

नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक, चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

नाफेडचे अधिकारी बाजार समितीत उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच निधन

वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले

नाशिकच्या चांदवड बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

पिंपळगाव पाठोपाठ चांदवड बाजार समितीमध्येही शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला


अंधेरीत पईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया


उद्धव ठाकरेंकडून आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वर्धा, यवतमाळ-वाशीम, रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज यवतमाळ, वाशिम दौऱ्यावर

लोकसभा मतदार संघात ‘घर चलो’ अभियानासाठी बावनकुळे आज दौऱ्यावर

‘घर चलो अभियान’ दरम्यान बावनकुळे प्रमुख व्यापाऱ्यांना भेटणार, तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीही घेणार


झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन जमीन घोटाळ्याप्रकरणी आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार

ईडीने यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यावेळी त्यांनी तातडीच्या कामाचे कारण देत ईडीसमोर हजर झाले नव्हते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यााच तिसरा दिवस

नरेंद्र मोदी आज जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत पंतप्रधान आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.


बिल्किस बानोच्या आरोपींच्या सुटकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून सुरू

कांद्यावर केंद्राने 40 टक्के निर्यातकर लागू केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प होते.

बुधवारी केंद्रीय मंत्री आणि दिंडोरीच्या खासदार भारती पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आजपासून व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -