घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

देखै मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥
पहा की, मेघापासून सुटणार्‍या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाहीत, त्याचप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे, त्याला शुभाशुभ कर्मे ही आपल्या रूपाहून वेगळी वाटत नाहीत.
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥
हा जो प्रत्यक्ष अनुभवास येणारा संसारिकभाव, त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला.
(मिथ्या ठरला) नंतर पुन: जो पाहू लागला तो जे अनुभवात्मक ज्ञान ते स्वतः तोच बनला.
आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥
असा निश्चय झाल्यानंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे अशी वाटाघाट करू लागल्यास, ती द्वैतबुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहते,
ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके । जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥
अर्जुना, ज्याने फक्त आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो.
तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणें सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ॥
तोच सहज जितेंद्रिय आणि तोच योगी होय. कारण, त्याला लहान आणि थोर हा भेद कधी नसतो.
देखैं सोनयाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचे डिखळ । सरिसेंचि मानी ॥
किती अभेदबुद्धी म्हणून सांगावी? असे पहा की, शुद्ध सोन्याचा मेरुएवढा पर्वत व मातीचे ढेकूळ ही दोन्ही जो सारखीच मानतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -