घरमहाराष्ट्रनितेश राणेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न; वकिलांचा युक्तिवाद, उद्या पुन्हा सुनावणी होणार

नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न; वकिलांचा युक्तिवाद, उद्या पुन्हा सुनावणी होणार

Subscribe

सरकारी वकील अटकपूर्व जामिनावर पहिल्यांदा जो युक्तिवाद करायचा आहे, तो अर्जदाराच्या वकिलांनी करायचा आहे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला तो आम्ही काळजीपूर्वक ऐकला. त्यांना काय म्हणायचं समजून घेऊन त्यांनी जो जो मुद्दा उपस्थित केलाय, त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे.

सिंधुदुर्गः संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असून, नितेश राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. तर उद्या दुपारी 2.45 वाजता या प्रकरणात सुनावणी होणार आहे. त्यावेळी सरकारही वकील आपला युक्तिवाद न्यायालयासमोर ठेवणार आहेत. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिलीय.

सरकारी वकील म्हणाले की, सरकारी वकील अटकपूर्व जामिनावर पहिल्यांदा जो युक्तिवाद करायचा आहे, तो अर्जदाराच्या वकिलांनी करायचा आहे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला तो आम्ही काळजीपूर्वक ऐकला. त्यांना काय म्हणायचं समजून घेऊन त्यांनी जो जो मुद्दा उपस्थित केलाय, त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. तर आमचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला नाही. उद्या आमचा युक्तिवाद सुरू राहील. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर आम्हाला बोलता येईल. गुन्ह्याची न्यायालयासमोर सुनावणी आहे. गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का यावर वकिलांनी बोललं पाहिजे. त्याऐवजी त्यांनी विधानसभेत काय झालं. कुठल्या मंत्र्यांनी कोणाचा सत्कार केला हे सांगितलं, असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय.

- Advertisement -

गुन्ह्यांचं रिपोर्टिंग करणं पत्रकारांचं काम आहे, आमचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारणी गुन्हेगाराच्या घरी जाऊन सांत्वन करतात, त्याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. न्यायालयासमोर पोलिसांचा तपास ठेवू आणि त्यांच्या अर्जाला आम्ही विरोध करू. आम्ही त्यांच्या युक्तिवादाला अजून उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे मी आता बोलू शकत नाही. उद्या जेव्हा वेळी तेव्हा आम्ही त्याच्यावर बोलू. न्याय देणारं आणि त्यांच्या समोर येणाऱ्या गोष्टींवर विचार करणारं न्यायालय आहे. आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्जाची मागणी न्यायालयानं नाकारलेली आहे, असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय.

दुसरीकडे नितेश राणेंच्या वकिलांनीही माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया दिलीय. नितेश राणेंना या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याकरिता त्यांना अटकपूर्व जामीन मिळायला हवा, असं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -