घरमहाराष्ट्रपोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

Subscribe

हर्सूल पोलिसांनी योगेशला अटक करुन कोर्टात हजर केले. त्याचा जामीन घेण्यासाठी कुणीच न आल्याने त्याला कोर्टाने कारागृहात पाठवले. वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी त्याला जेलमध्ये पाठवले.

औरंगाबादमध्ये कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्सूल जेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आलेल्या कैद्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. योगेश राठोड या २९ वर्षाच्या कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने तो बेशुध्द पडला होता. तो बेशुध्द झाल्यामुळे त्याला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. योगेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळेच योगेशचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. याविरोधात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

जामीन न मिळाल्याने जेलमध्ये पाठवले

औरंगाबादच्या भारंबा तांडा येथे राहणारा योगेश राठोड हा व्यवसायाने मिस्त्री होता. त्याच्या विरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. त्यानुसार १७ जानेवारीला हर्सूल पोलिसांनी योगेशला अटक करुन कोर्टात हजर केले. त्याचा जामीन घेण्यासाठी कुणीच न आल्याने त्याला कोर्टाने कारागृहात पाठवले. वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी त्याला जेलच्या ताब्यात संध्याकाळी सात वाजता दिले होते. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कारागृह पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

आरोपीच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा

योगेश राठोडला कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती त्यामुळे तो बेशुध्द पडला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. योगेशला मारहाण केलेल स्पष्ट दिसून येत होते. त्याच्या हातावर, पाठीवर, पायाभर आणि पोटावर मारहाण केल्याच्या खूणा स्पष्टपणे दिसत होत्या. योगेशची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

मृतदेह ताब्यात घेण्यात नातेवाईकांचा नकार

जेलमध्ये असलेल्या पोलिसांनी आरोपी योगेश राठोला बेदम मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी दोषींविरोधात कारवाई करत हत्येचा गुन्हा दाखल करवा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत सचिनचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच योगेशचे ५०० पेक्षा अधिक नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. जोपर्यंत दोषीवर गुन्हे दाखल होत नाही आणि त्याना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – 

सोनई हत्याकांडातील एका आरोपीचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -