घरमहाराष्ट्रपक्षनिष्ठ थोरात! नाराजी बाजूला ठेवत कसबा पोटनिवडणुकीसाठी उतरले मैदानात

पक्षनिष्ठ थोरात! नाराजी बाजूला ठेवत कसबा पोटनिवडणुकीसाठी उतरले मैदानात

Subscribe

नाशिक शिक्षक व पदवीधर निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असा वाद रंगताना दिसला. थोरातांनी नाना पटोलेंविरोधात नाराजी उघड करत पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले, यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा पाठवल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाल्या आहेत. बाळासाहेब थोरात (balasaheb thorat ) आपल्या राजीनाम्यावरती ठाम आहेत. असे असले तरी बाळासाहेब थोरातांनी पक्षनिष्ठता कायम ठेवली आहे, थोरातांनी पक्षाअंतर्गत नाराजी बाजूला ठेवत कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली आहे. काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात थोरात सहभाग घेणार आहेत.

यासाठी बाळासाहेब थोरात पुढच्या आठवड्यात कसबा पेठमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे थोरातांची नाराजी ही केवळ पक्षपातळीवर आहे. मात्र उमेदवारीच्या प्रचारात ते सक्रिय सहभाग घेणार आहेत. थोरातांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये एक चांगले संदेश जाणार आहे. यामुळे काँग्रेसमधील नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगत असले तरी कसबा निवडणुकीत काँग्रेस एकसंघ दिसेल.

- Advertisement -

दरम्यान नाशिक शिक्षक व पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून रंगलेल्या राजकारणानंतर थोरात काय भूमिका मांडतात याकडे राजकीय नेत्यांचं लक्ष लागून होतं. थोरातांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले, मात्र हे आरोप पक्षीय पातळीवरचे आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही निवडणुकीवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी थोरातांकडून प्रयत्न केले जाच असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मी पक्षपातळीवर भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी नाना पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार दाखल केली. यासंदर्भात काँग्रेसची मुंबईत पक्ष कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकं काय होतं याकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे.

- Advertisement -

काँग्रेस हा आपला विचार आहे. तो पुढे घेऊन जायचं आहे. काही राजकारणं झालं तरी त्या संदर्भात पक्षीय व्यासपीठावर भूमिका मांडली जाईल, असं थोरातांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आत ते पुण्यात जाहीर सभा घेत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही एक नवा उत्साह आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या वेळापत्रक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -