घरदेश-विदेशसैनिक हो तुमच्यासाठी...

सैनिक हो तुमच्यासाठी…

Subscribe

झुरतात अंतरे कोटी! , वीरपुत्रांना अखेरचा निरोप

बुलढाणा8पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना त्यांच्या मूळगावी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यात मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणारचे नितीन राठोड यांच्यावर त्यांच्या मूळगावी शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिकांच्या अलोट गर्दीत यावेळी महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा निरोप देण्यात आला असून यावेळी उपस्थित प्रत्येकांचे डोळे पाणावले होते. वंदे मातरमच्या जयघोषात आणि पाकचा बदला घेण्याच्या आवेशात यावेळी हजारो देशवासीय दोन्ही शहीदांच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान येथील शहिदांनाही अखेरचा निरोप देताना संपूर्ण देश शनिवारी शोकसागरात बुडाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक भावनिक क्षण पाहायला मिळत आहेत. लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. हातात गुलाबाची फुले आणि राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचे दृश्य देशभरात होते. महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांसह इतर सर्व शहीद जवानांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंत्रीगणही उपस्थित होत

काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. ज्यात महाराष्ट्रातील बुलढाण्यातील दोघाजणांचा समावेश होता. यात मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणारचे नितीन राठोड यांनी देशासाठी प्राण अर्पण केले. या दोन्ही वीरपुत्रांवर शनिवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाण्याचे जवान संजय राजपूत यांना स्थानिकांच्या प्रचंड गर्दीत अखेरचा निरोप देण्यात आला. मूळगावी मलकापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मलकापूरच्या रहिवाशांनी संजय राजपूत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढंच नव्हे तर काही जण झाडांवरदेखील चढलेले पाहायला मिळाले. ‘संजय राजपूत अमर रहे’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. संजय राऊत यांनी तब्बत 23 वर्षे देशसेवेसाठी अर्पण केली आहेत.संजय यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुलं आणि २ भाऊ असा परिवार आहे. दरम्यान पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आणि संजय राजपूत यांना मानवंदना देण्यासाठी मलकापूरमधल्या मुस्लीम बांधवांनी रॅली काढली. एकीकडे शोकाकूल वातावरण या वीरपुत्रांना निरोप देण्यात आला असला तरी या हल्ल्याविरोधातील रोष हा त्यांच्या अश्रूंनी समोर आला.

- Advertisement -

बुलढाण्याचे दुसरे सुपुत्र म्हणजे नितीन राठोड. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या नितीन राठोड यांचं पार्थिव दुपारच्या सुमारास त्यांच्या मूळगावी म्हणजे लोणारमध्ये दाखल झाले होते. राठोड यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंचक्रोशी लोणारमध्ये लोटली होती. राठोड शहीद झाल्याचं वृत्त कळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. संपूर्ण गाव नितीन राठोड यांना दादा नावानं ओळखायचं. मात्र दहशतवादी हल्ल्यात लोणारचा दादा शहीद झाला. गावातल्या प्रत्येक घरचा सदस्य हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सरकारला विरोधकांची साथ
नवी दिल्ली:पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात सगळा देश एकवटला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही दहशतवाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं विरोधी पक्षांनी मान्य केलं. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली. आपल्या देशातून दहशतवाद उखडून टाकण्यासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. ते सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मान्य केले. या बैठकीत पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच एक त्रिसूत्री प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

काश्मीरमध्ये मेजर शहीद
नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच शनिवारी एलओसीच्या राजौरीमध्ये आयईडीचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या स्फोटात सैन्य दलातील एक अधिकारी शहीद झाला आहे. शनिवारी संध्याकाळी एलओसीजवळ पेट्रोलिंग पार्टीजवळ हा स्फोट झाला आहे. पण अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पण नेमका हा स्फोट कसा झाला याचा आता तपास सुरू आहे.

जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ
मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तर शिर्डी संस्थानाने देखील शहीद जवानांसाठी 2.51 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.याचबरोबर रिलायन्स फाऊंडेशनने शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. तर क्रिकेटपटू गौतम गंभीर तसेच वीरेंद्र सेहवाग यांनी मुलांना मदतची घोषणा केली आहे.

भारताला अमेरिकेचा पाठिंबा
नवी दिल्ली: स्वसंरक्षणार्थ भारत जी दहशतवादविरोधी कारवाई करेल त्याला अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी भूमिका अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताला कळवली आहे. याप्रसंगी अमेरिका भारतासोबत असून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासाठीही अमेरिका प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पुलवामाच्या घटनेनंतर बोल्टन यांनी शुक्रवारी सकाळी डोवाल यांना फोन करून सांत्वना व्यक्त केली. तसंच दहशतवादाविरोधात भारताची पुढील रणनीती काय असेल याबद्दल चर्चाही केली. आत्मसंरक्षणार्थ भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केल्यास अमेरिका त्याला पाठिंबा देईल, असंही त्यांनी सांगितलं

जैश-ए-मोहम्मदची सगळी सूत्रं पाकिस्तानातून हलवली जातात. तेव्हा त्यांचे पाकिस्तानातील अस्तित्व संपवण्यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाहीदेखील अमेरिकेने दिली आहे. एकीकडे भारताला मदत करण्यास तयार असतानाच दुसरीकडे पाकिस्तानने दहशतवाद संपवावा अशी सक्त ताकीदच परराष्ट्र सचिव माइक पॉम्पिओ यांनी पाकिस्तानला दिली आहे. यानंतर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारत कसं प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -