घरदेश-विदेशअझहरने पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून दिले हल्ल्याचे आदेश

अझहरने पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून दिले हल्ल्याचे आदेश

Subscribe

मसूद अजहरने जारी केलेल्या ऑडिओमध्ये माझा भाचा उस्मान याच्या हत्येचा बदला घ्या असे म्हटले आहे. उस्मानला २०१८ मध्ये जवानांनी ठार केले होते.

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरनेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याला मंजूरी दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मसदू अझहरने रावलपिंडी येथे असणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या तळावर बसून आपल्या साथिदारांना पुलवामा सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला करण्याचे निर्देश दिले होते. अझहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या रावळपिंडी येखील लष्कराच्या तळावरील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजहरने एक ऑडिओ क्लिप जारी करत दहशतवाद्यांना हल्ला करण्याचे आदेश दिले असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आठ दिवसापूर्वीच केल होती तयारी

मसूद अजहर गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे त्याने युनायटेड जिहाद काऊंसिल (यूजेसी) च्या प्रमुख ६ बैठकिंमध्ये सहभागी घेतला नाही. यूजेसी भारताविरोधात वापरली जाणारी जिहादी संघटना आहे. या संघटनेचे संरक्षण पारिस्तानकडून केले जाते. दरम्यान, आठ दिवसापूर्वी या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी तयार झाले होते. याचवेळी अजहरने आपल्या साथिदारांसाठी एक ऑडिओ मॅसेज जारी केला.

- Advertisement -

उस्मानच्या हत्येचा बदला घ्या

मसूद अजहरने जारी केलेल्या ऑडिओमध्ये माझा भाचा उस्मान याच्या हत्येचा बदला घ्या असे म्हटले आहे. उस्मानला २०१८ मध्ये जवानांनी ठार केले होते. या ऑडिओमध्ये त्याने असे देखील म्हटले आहे की, ‘या हल्ल्यात मृत्यूपेक्षा जास्त चांगली बाब कोणतीच असू शकत नाही.’ हेच नाही तर या ऑडिओच्या माध्यमातून तो त्याच्या साथिदारांना भारताच्याविरोधात भडकवत आहे.

काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी

काश्मीरमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जैश-ए-मोहम्मदचा कोणताही व्यक्ती पुढे येणार नाही. ते त्यांचे प्रमुख नेता – उमेर, इस्माइल आणि अब्दुल राशिद गाजी यांच्यासोबत उत्तर काश्मीरमध्ये लपून बसले आहेत. काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे जवळपास ६० दहशतवादी काम करत आहेत. ज्यामध्ये ३५ पाकिस्तानचे आहेत बाकी सर्व काश्मीरचेच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -