घरमहाराष्ट्रआम्हाला आरक्षण नको, संरक्षण द्या - ब्राह्मण महासंघाची मागणी

आम्हाला आरक्षण नको, संरक्षण द्या – ब्राह्मण महासंघाची मागणी

Subscribe

पुण्यात सध्या ब्राह्मण महासंघाचं अधिवेशन सुरू आहे. यावेळी सरकारनं अयोध्येत राम मंदिर उभारावं, शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, ब्राह्मण समाजाला आरक्षणापेक्षा संरक्षण द्यावे आणि आरक्षणाबाबत काळानुसार बदल करावेत इत्यादी ठराव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आले.

पुण्यात सध्या ब्राह्मण महासंघाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये सरकारनं अयोध्येत राम मंदिर उभारावं, शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, ब्राह्मण समाजाला आरक्षणापेक्षा संरक्षण द्यावे आणि आरक्षणाबाबत काळानुसार बदल करावेत इत्यादी ठराव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आले. पुण्यात सध्या ब्राह्मण महासंघाचं अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी या मागण्या करण्यात आल्या.

शबरीमाला आणि राम मंदिर

१० ते ५० वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश देण्यात यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. पण भक्तांनी मात्र निर्णयाला विरोध केला आहे. त्यावरून सध्या शबरीमला मंदिर परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांनी हजारो भक्तांना ताब्यात घेतलं आहे. दिवसेंदिवस हा वाद अणखी चिघळताना  दिसत आहे. तर काही महिलांनी केलेल्या मंदिर प्रवेशाला देखील यश आले नाही.

- Advertisement -

तर दुसरीकडे, राम मंदिराच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयाने मात्र जानेवारी २०१९पर्यंत राम मंदिराच्या निर्णयावर सुनावणी घेण्यास नकार दर्शवला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं यासाठी शिवसेना – भाजप आक्रमक झाले आहेत. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडताना दिसत आहे. सारं प्रकरण सध्या न्यायप्रवष्ठ आहे.

तसेच, आरक्षणासाठी देखील धनगर, मराठा, मुस्लिम समाज आक्रमक झाले आहेत. त्यावेळी ब्राह्मणांच्या आरक्षणाची देखील मागणी होऊ लागली. मात्र ब्राह्मण समाजाला आरक्षणापेक्षा संरक्षण द्यावे अशी मागणी ब्राह्मण महासंघाचं अधिवेशनात करण्यात आली आहे. शिवाय अधिवेशनामध्ये काळानुसार बदल करण्याचा ठराव देखील या अधिवेशनामध्ये करण्यात आला.

वाचा – अयोध्या प्रश्नावरील सुनावणी जानेवारी २०१९पर्यंत तहकूब

वाचा – शबरीमला मंदिर प्रवेश वाद: १३ नोव्हेंबरला पुनर्विचार याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -