घरमहाराष्ट्रपाऊस, नैसर्गिक आपत्ती, पीक-पाणी; ऐका भेंडवळची भविष्यवाणी

पाऊस, नैसर्गिक आपत्ती, पीक-पाणी; ऐका भेंडवळची भविष्यवाणी

Subscribe

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी बुधवारी आठ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली.

संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली सुमारे साडे तीनशे वर्षाची परंपरा म्हणजे भेंडवळची भविष्यवाणी. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज, बुधवारी आठ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस कमी तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकऱ्यांना यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले. पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. ही भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तवली आहे. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच आजूबाजूच्या गावातून हजारो शेतकरी येथे आले होते.

काय असेल पावसाची स्थिती

पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त, सार्वत्रिक पाऊस होणार नाही. दुसरा महिना चांगला पाऊस होईल. तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल. चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील. यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले. त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील, असा अंदाज आहे.

- Advertisement -

पृथ्वीवर अनेक संकटे येतील

चारा-पाण्याची टंचाई येईल तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आहे म्हणजेच अर्थव्यवस्था डगमगेल आर्थिक ताण देशावर येईल. परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल. परंतु त्याला मात्र आपले संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल तर राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर तेचे संकेत दिले आहेत. गटातील चारा-पाण्याची प्रतीक असलेली चांडोली कोरडी गायब आहे. त्यामुळे भीषण चारा टंचाई यावर्षी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी गुराढोरांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गटातील घागरीवर असलेली पुरी गायब आहे त्याचा अर्थ पृथ्वीवर अनेक संकटे येतील, सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य, असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -