घरमहाराष्ट्रप्रशासनाच्या आवाहनाला भीमसैनिकांचा प्रतिसाद

प्रशासनाच्या आवाहनाला भीमसैनिकांचा प्रतिसाद

Subscribe

येथील चवदार तळे सामाजिक क्रांतीच्या ९३ व्या वर्धापन दिनी शुक्रवारी 20 मार्च रोजी अभिवादन करण्यासाठी प्रमुख व्यक्तींसह अन्य कोणीही उपस्थित राहिले नाही. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला भीमसैनिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने त्यांच्या स्वयंशिस्तीचे कौतुक होत आहे. जेथे सत्याग्रह स्मृतीदिनी गेली ९३ वर्षे अलोट गर्दीचे समीकरण ठरून गेलेले असायचे तेथे यावेळी करोनाच्या सावटामुळे प्रथमच शुकशुकाट दिसून आला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी केलेल्या सामाजिक क्रांतीचा वर्धापन दिन लाखो भीमसैनिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. याकरिता विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या अभिवादन सभा होत असतात. शिवाय पुस्तक विक्रेते, भीमस्तुतीपर गीतांच्या सीडी विक्रेत्यांच्या दुकानांनी हा परिसर गजबजून जातो. यावेळी हा संपूर्ण परिसर शांत होता. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे भीमसैनिक देखील न आल्याने केवळ प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते अभिवादन करून निघून जात होते. नगर पालिका प्रशासनाने येणार्‍या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा केल्या होत्या. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

स्थानिक आमदार भरत गोगावले, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर गायकवाड यांच्यासह सिद्धार्थ कासारे, मोहन खांबे, केशव हाटे, सखाराम सकपाळ, कुंदन हाटे, विश्वनाथ सोनावणे, संदीप जाधव, प्रकाश मोरे आदींनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -