घरमहाराष्ट्रभिमाशंकर अभयारण्यातील काम निकृष्ट दर्जाचे

भिमाशंकर अभयारण्यातील काम निकृष्ट दर्जाचे

Subscribe

भिमाशंकर विकास आराखडा आणि महादेव वन निसर्ग पर्यटन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येत आहे.

भिमाशंकर अभयारण्याला निसर्गाचे स्वर्ग म्हटलं जात. मात्र असे असताना वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या पुढाकारातून भिमाशंकर विकास आराखडा आणि महादेव वन निसर्ग पर्यटन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये दिरंगाई आणि हालगर्जीपणा होत असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या स्वप्नातील भिमाशंकर परिसरात वनपर्यटनाची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. असे असून देखील वनविभागाच्या आधिकाऱ्यांना वनमंत्र्यांची भितीच राहिली नाही का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

खेड तालुक्यात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर आणि अभयारण्य परिसरात वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी भिमाशंकर अभयारण्याची पाहणी केली असता. त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत आधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. तर या झालेल्या कामाचा अहवाल त्वरित सादर करावा असे आदेश देखील वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पहाणी दौऱ्याला भिमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, सहाय्यक वन संरक्षक गिता पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप झगडे हे उपस्थित होते .

- Advertisement -

भिमाशंकर पर्यटनासाठी कोटीचा निधी

भिमाशंकर येथे महादेव वन पर्यटनासाठी शासनाने ४ कोटी ५४ लक्ष रुपये निधी दिला आहे. साडेतीन हेक्टरवर हे उद्यान उभारले जाणार असून यामध्ये पाण्याची टाकी, जलकुंड ( वनतळी ) यासाठी २५ लक्ष, तर झाडांसाठी ३ लक्ष रूपये आणि पाथवे बांधण्यासाठी ९ लक्ष रुपये लागले आहेत. तर झाडांना ओटे बांधण्यासाठी ४० लक्ष रुपये लागणार आहे. असे या विकासकामाचे स्वरूप आहे.

या कामांची चौकशी करा

झाडांसाठी ३ लक्ष रुपये खर्च झाला असला तरी देखील त्यातील बरीच झाडे मरून गेली आहेत. तर झाडांचे ओटे, पर्यटक बसतात ते ओटे यांचे काम झाले नसताना देखील त्याचेही पैसे काढले गेले आहेत. तर भिमाशंकर वनपरिक्षेत्र कार्यालय संरक्षण भिंतीचेही टेंडर तुकडे करण्यात आले आहेत. ग्रीन भिमा आणि महादेव वनासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी कोटेशन मंजूर करताना स्वतःच्या गावातील नातेवाईक आणि मित्रांना देण्यात आले आहे. ही सर्व कामे निकृष्ठ दर्जाची झाली असून या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार गोरे यांनी केली आहे .

- Advertisement -

भिमाशंकर देवस्थान परिसरात आणि महादेव वनात वनविभागाकडून होत असलेली कामे ही व्यवस्थित होत नाही. अभारण्याच्या नियमांचे उल्लंघन करुन ही कामे केली जातात त्यामुळे अभारण्य परिसराला धोका आहे.  – सुरेश कौदरे, अध्यक्ष भिमाशंकर देवस्थान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -