घरमुंबई‘या’ ९ कारणांमुळे क्षयरुग्णालयातील ६२ शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

‘या’ ९ कारणांमुळे क्षयरुग्णालयातील ६२ शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये विविध कारणांमुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी आणि एकमेव असणाऱ्या क्षय रुग्णालयात लाखोंच्या संख्येने क्षयरुग्ण दाखल होतात. अनेकदा अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या पाच वर्षात शिवडी क्षय रुग्णालयात एकूण ९ हजार ४२१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील जवळपास ६२ शस्त्रक्रिया अनेक आणि विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. सर्वसाधारण रुग्णालयातील शस्त्रक्रियांवर गरजू अवलंबून असतात. त्यामुळे येथील रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीत रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. शिवडी क्षय रुग्णालयात क्षय रुग्णांची उपचारासाठी नेहमीच ये-जा सुरु असते. त्यांच्यावर औषधांसह शस्त्रक्रियांनी देखील उपचार सुरु असतात. पण, आतापर्यंत एकूण ६२ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची वेगवेगळी ९ कारणे देण्यात आली आहे.

हे देखील वाचा – लहान मुलांमध्ये बळावतोय क्षयरोग

या कारणांमुळे पुढे ढकलल्या शस्त्रक्रिया

  • रुग्ण शस्त्रक्रियेसाठी अनफीट असल्याने ३८ म्हणजे सर्वाधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • तर, शस्त्रक्रियेसाठी रक्तसाठा नसल्याने ९ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • निवासी डॉक्टर आणि प्रयोगशाळा अनुपलब्धता या दोन कारणांमुळे प्रत्येकी ४ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
  • भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने ३ शस्त्रक्रिया
  • तर निवासी डॉक्टरांचा संप, रुग्णांच्या निधनामुळे, मुसळधार पावसामुळे आणि नातेवाईक शस्त्रक्रियेसाठी तयार नसल्याने चार कारणांमुळे प्रत्येकी १ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • आजतागायत निव्वळ ५ रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगण्यात आले आहेत.

याविषयी शिवडी क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितलं की, “ टीबी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असे काही महत्त्वाचे निकष आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, शस्त्रक्रिया सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आहे. शिवाय, फुफ्फुसांचा दुसरा भाग सर्वसाधारणपणे कार्यरत आहे आणि त्यावर वेळेवर शस्त्रक्रिया करावी की करु नये हे समजणं ही महत्त्वाचं आहे. ३० टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात.”

मुंबई, ठाणे, पालघरमधील मुलांवर क्षयरोगाची वक्रदृष्टी !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -