घरठाणेभिवंडीचे आजी, माजी उपविभागीय अधिकारी निलंबित

भिवंडीचे आजी, माजी उपविभागीय अधिकारी निलंबित

Subscribe

 ठाणे, पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची विभागीय आयुक्तमार्फत चौकशी

नागपूर : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील जमीन मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांच्या फसवणूकी प्रकरणी भिवंडीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. ठाणे, पालघर जिल्ह्यातील जमिनी प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पसाठी संपादित करण्यात येत आहेत. या भुसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वं तक्रारीची विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -

ठाणे व पालघर जिल्ह्यात समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा विकास प्रकल्पांची काम सूरु आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. भुसंपादना मध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना लाभ देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

अंजूरगाव येथील शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या मृत्यूची विभागीय आयुक्तमार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही विखे म्हणाले.

- Advertisement -

दोडे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आकस्मिक मदत करण्याचे तसेच त्यांच्या जमिनीचा मोबदला संबंधितांना मिळेल या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -