घरताज्या घडामोडीअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले भुजबळ

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले भुजबळ

Subscribe

मुंबई नाशिक महामार्गावर घडला अपघात

मुंबई नाशिक महामार्गावर एका वाहनाचा अपघात झाल्याचे पाहून राष्ट्रवादीचे नेते जिल्हयाचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तेथे थांबत अपघाताची माहिती घेत तातडीने मदत पोहचवण्यासंदर्भात सूचना केल्या. भुजबळांच्या सूचनेमुळे यंत्रणेनेही तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू केल्या.

भुजबळ शनिवारी सकाळच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येत असतांना कसारा घाटात अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली,अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उपस्थित पोलीस अधिकार्‍यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना यावेळी दिल्या. भुजबळांनी स्वतः या ठिकाणी थांबून मदत पोहचवण्यासंदर्भात पावलं उचलल्याने यंत्रणाही कामाला लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -