घरताज्या घडामोडीपोलिसांच्या दडपशाही विरोधात वरिष्ठांशी चर्चा करून आंदोलन उभारले जाणार - भाजपा जिल्हाध्यक्ष...

पोलिसांच्या दडपशाही विरोधात वरिष्ठांशी चर्चा करून आंदोलन उभारले जाणार – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जाणीवपूर्वक भाजपाच्या विरोधात पोलीस यंत्रणा उभी केली जात आहे पोलिसांच्या या दडपशाही विरोधात वरिष्ठांशी चर्चा करून आंदोलन उभारले जाणार आहे भाजपा कार्यकर्त्याना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन सविस्तर माहीती देण्यात आली, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला व सता येते जाते हेही अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही दिला.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली याच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून होणाऱ्या दुजाभावा बाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई,बाबली वायगंणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजन तेली पुढे म्हणाले की जिल्ह्यात सध्या पोलिसांकडून जी दडपशाही सुरू आहे त्याची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. पोलीस अधीक्षक बाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही पोलीस जाणीवपूर्वक भाजपा कार्यकर्त्यांना जो त्रास देत आहेत त्याबाबत असंतोष पसरला आहे पोलिसांच्या या दडपशाही विरोधात आंदोलन उभारण्यात येणार आहे .लवकरच भाजपा कार्यकारिणीची बैठक घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

- Advertisement -

संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयाने जे निर्णय दिले त्या निर्णयाचा आम्ही आदरच करतो परंतु आमदार नितेश राणे ज्यावेळी जिल्हा न्यालयातून बाहेर आले त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले हे योग्य नाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दहा दिवसाचे संरक्षण दिलेले असताना पोलीस आधीच अटक करण्यासाठी अडवत होते हे बेकायदेशीर कृत्य आहे आणि आमदार राणेंना का अडवन्यात आल म्हणून विचारल्यावर माजी खासदार निलेश राणेंवर व भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला हा पोलिसांचा दुजाभाव आहे.

सातधारी आमदारांनी काही केलं तरी चालत त्याच्यावर मात्र कारवाई नाही कोरोना काळात डॉक्टर नाही म्हणून आंदोलन केले तर भाजपा कार्यकर्त्यावर गुन्हे आणि आमदार दीपक केसरकर गर्दी करून भूमिपूजने करतात त्यावर मात्र कारवाई केली जात आहे कुणाच्यातरी सांगण्यावर असे वागणे योग्य नाही. पोलीस एवढेच जर अलर्ट आहेत तर दररोज 250 वाळूच्या गाड्या गोव्यात जातात त्यावर मात्र पोलीस कारवाई करत नाहीत गोव्याची दारू सर्व महाराष्ट्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाते मग त्यावर कारवाई नाही पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सर्व राजरोस सुरू आहे आणि फक्त भाजपा कार्यकर्त्यांना कायदा वापरला जातो आहे कायदा सर्वाना समान असायला हवा पण पोलीस यंत्रणा तस करत नाही
जिल्हा पोलिस अधीक्षक दबावाखाली काम करत आहेत परंतु त्यांनी लक्षात ठेवावे सत्ता येते जाते त्यामुळे सर्वाना समान कायदा वापरावा असा इशारा देत जिल्ह्यात भाजपा कार्यकर्यांना जो त्रास दिला जात आहे त्या विरोधात आंदोलन करणार असे राजन तेली यांनी सांगितले.

- Advertisement -

माजी आमदार अजित गोगटे यांनी बोलताना जिल्हा सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले असताना आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालया बाहेर अडवून अटक करण्याचा प्रयत्न पोलसाकडून करणे हा पोलिसांचा गुन्हा आहे त्यांमुळे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले. अतुल काळसेकर बोलताना म्हणाले की आमदार नितेश राणेना चुकीच्या पद्धतीने गोवले गेले आहे आणि जाणीवपूर्वक भाजपाच्या विरोधात पोलीस व शासकीय यंत्रणा उभी केली आहे परंतु भाजपा आमदार राणे यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएल २०२२ चे सामने कोणत्या शहरात खेळले जाणार?, सौरव गांगुलीचा मोठा खुलासा


 

पोलिसांच्या दडपशाही विरोधात वरिष्ठांशी चर्चा करून आंदोलन उभारले जाणार – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -