घरक्रीडाIPL 2022 : आयपीएल २०२२ चे सामने कोणत्या शहरात खेळले जाणार?, सौरव...

IPL 2022 : आयपीएल २०२२ चे सामने कोणत्या शहरात खेळले जाणार?, सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

Subscribe

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या रणधुमाळीला सुरूवात होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. आयपीएलचं मेगा लिलाव १२ आणि १३ फ्रेबुवारी रोजी पार पडणार आहे. परंतु आयपीएलचे सामने भारतातील कोणत्या शहरात खेळवले जाणार याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच घेण्याचा निर्णय सौरव गांगुली यांनी घेतला आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यासाठी गांगुली उत्सुक आहेत. त्याचसोबतच नॉकआऊटच्या सामन्यांचा देखील विचार केला जात आहे.

नॉकआऊच्या सामन्यांवर विचारविनिमय सुरू

सौरव गांगुली यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, यंदाची आयपीएल स्पर्धा भारतामध्येच खेळवली जाणार आहे. जो पर्यंत कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत नाही. तोपर्यंत सामने भारतामध्येच खेळवले जाणार आहेत. नॉकआऊटच्या सामन्यांबाबत काही दिवसांमध्येच निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बीसीसीआयला आयपीएलची सुरूवात आणि कार्यक्रमांचं आयोजन करायचं आहे. याआधी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२०चं संपूर्ण हंगाम आणि २०२१ चं दुसरं सत्र दुबईमध्ये घेण्यात आलं होतं. क्रिकेट प्रेमींना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चाहत्यांना आणि दर्शकांना मैदानात एन्ट्री मिळणं अधिक कठीण होऊ शकतं.

रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्याची शक्यता

आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या लिलावाची प्रक्रिया १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. मेगा लिलावात ५९० खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात एकूण १० क्रिकेट संघाचा समावेश असणार आहे. परंतु रणजी ट्रफीचं आयोजन करण्याची शक्यता सौरव गांगुली यांच्याकडून वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भारतात तीन डोस असलेल्या Zydus Cadila लसीचा पुरवठा सुरु; सुईशिवाय मिळणार लस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -