घरताज्या घडामोडीमालमत्ता करमाफीचे श्रेय आमचेच, भाजपच्या नेत्यांना दावा

मालमत्ता करमाफीचे श्रेय आमचेच, भाजपच्या नेत्यांना दावा

Subscribe

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या ५०० चौरस फुटांच्या घरासाठी मालमत्ता करमाफी जाहीर करताच भाजपने या माफीचे श्रेय आपलेच असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपत नाहीत तोच भाजपचे अतुल भातखळकर, किरीट सोमय्या आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी श्रेयाचा दावा केला.

भाजप आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केलीय. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा राजकीय आणि नाट्यमय आहे, असे सांगताना यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता, असा दावा केला आहे.

- Advertisement -

सेनेच्या वचननाम्यातील घोषणेचा भाग म्हणून ही करमाफी जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. हा आधार घेत या नेत्यांनी वचननाम्याच्या पूर्ततेला दोन वर्षे का लागली असा सवाल विचारला आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. करमाफी जाहीर करण्यात आल्यानंतर या नेत्यांनी आदित्य ठाकरेंच्या मोफत लस देण्याच्या घोषणेकडे लक्ष वेधले. या मोफत लसीचे काय झाले असा सवाल या नेत्यांनी केला. सातत्याने टीकेचा सूर लावणारे किरीट सोमय्या यांनी शिवसेना पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप केला. २५ वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला का निर्णय घेता आला नाही, असे किरीट यांनी विचारले आहे. सेनेने मुंबईला लुटले आणि बुडवून दाखवल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लोकांना वचन देऊन फसवणार्‍यांची संख्या कमी नाही, असे म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारभारावर टीका करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी युतीचे वचन दिले; पण ते सोयीने विसरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -